जनाची नाहीतर मनाची बाळगा, मातोंडकरांना उपाध्येंचे प्रत्युत्तर

    दिनांक  10-May-2021 17:50:40
|

keshav upadhyey_1 &n

 

मुंबई :
राज्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करत विरोधी पक्ष भाजप आणि केंद्रावर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना भाजपने चोख प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारचे केंद्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयाकडून कौतुक होत असताना विरोध करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी असे विधान उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटमध्ये केले होते. यालाच  भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 
केशव उपाध्ये यांनी मातोंडकर यांचे ट्विट रिट्विट करत म्हंटले आहे की, अगदी बरोबर सांगितले जनाची नाहीतर मनाची ठेवलीच पाहिजे. पण हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना लागू होत नाही. कारण मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल म्हणाले की, केंद्र सरकार तातडीने मदत करते आहे. तसेच केंद्र सरकार प्रभावी आणि कार्यक्षमतेने मदत करीत असल्याचे राज्य सरकारचेही म्हणणे आहे, असे म्हणत उपाध्ये यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना टोला लगावला.


दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, पंतप्रधान तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मुंबई महानगरपालिका आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कोविड व्यवस्थापनावरून कौतुक करीत आहेत. हे दोन्ही ट्विट उत्साहवर्धक आणि प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी आता ओरडणे बंद करावे.
जनाची नाही तर मनाची लाज ठेवा, असे ट्विट केले होते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.