कोरोनायोध्याचं असं खच्चीकरण मान्य आहे का ? : चित्रा वाघ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2021
Total Views |

chitra wagh_1  



मुंबई :
राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना आरोग्य सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी २४ तास रुग्णसेवा देत आहेत. मात्र अशावेळी वर्ध्यात मात्र माजी काँग्रेस मंत्र्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोरोनायोद्धांचं होणारं हे खच्चिकरण आपल्याला मान्य आहे का ? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केला आहे.

चित्रा वाघ या ट्विट करत म्हणाल्या की, "क्लीप ऐकून महाराष्ट्राला कळालं असेल कि कॉंग्रेसचे माजी मंत्री रणजीत कांबळेंना बोलताही येतयं. कारण मंत्री असतांना मौनीमंत्री म्हणून ओळख असणारे आता आरोग्य अधिकाऱ्याला अर्वाच्य शिव्या देताहेत. कोरोनायोद्धांचं होणारं हे खच्चिकरण आपल्याला मान्य आहे का ?", असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ट्विटमध्ये टॅग करत केला आहे.


दरम्यान माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार दिली आहे. ९ मे रोजी नाचन गाव येथे आरोग्य शिबीर पार पडले. यामध्ये नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. या शिबिराची माहिती मिळताच आमदार कांबळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कॉल केला. समोर आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कांबळे म्हणत आहेत की, कोरोना चाचणी केंद्रे आमच्या परवानगी शिवाय कसे सुरु केले? आरटीपीसीआर चाचण्या करायच्या आहेत तर लॉकडाऊन मध्ये का सुरु केले आहे? आम्हाला बाहेर निघून देत नाहीत मात्र बाहेर आमच्या परवानगी शिवाय चाचण्या करतात.तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता.. तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार असे म्हणत शिवीगाळ केली आहे. तसेच तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे.
@@AUTHORINFO_V1@@