कोरोना तुमच्या कपातला चहासुद्धा पळवणार!

10 May 2021 15:41:00
tea_1  H x W: 0
 



गुवाहाटी : 'नॉर्थ इस्टर्न टी असोसिएशन'ने आसाम सरकारकडे चहा कामगारांची त्वरीत लसीकरण करण्याची मागणी केली आहे. इथे काम करणाऱ्या एकूण ५०५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चहाचे मळेही या कारणामुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
 
 
 
याचा परिणाम थेट देशातील चहा व्यापारावर होण्याची भीती असल्याने लसीकरणाची मागणी लावून धरली जात आहे.
कोरोनापासून चहा कामगारांना संरक्षण द्यायला हवे त्यासाठी त्यांचे त्वरित लसीकरण करायला हवे असे, 'नॉर्थ इस्टर्न टी
असोसिएशन'चे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर कामगारांना कोरोना संसर्ग झाल्याने काहींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.



कोरोनाची साखळी इथे तुटली नाही तर येत्या काळात चहाप्रेमींना चहापासून वंचित रहावे लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आसामच्या बहुतांश भागात लसीकरण झालेले नाही. त्यामूळे कोरोनाचे संक्रमण फोफावले आहे. गतवर्षी सर्वकाही बंद असताना शेती व्यवसाय चालू होता. संपूर्ण देशाला शेतीचे महत्त्व कळले होते. आता पुन्हा एकदा तिच परिस्थिती उद्भवली आहे.







Powered By Sangraha 9.0