इंग्लंडला जाण्यापूर्वी भारतीय संघाने घेतली लस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2021
Total Views |

Team India_1  H
 
 
 
मुंबई : बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. त्यानंतर आता संपूर्ण भारतीय संघ हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज झाली आहे. त्यापूर्वी भारतीय संघाने लसीकरण करून घेतले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि जलदगती गोलंदाज इशांत शर्मा यांनी सोमवारी लस घेतल्याची माहिती सोशल मिडियावरून दिली. तसेच, सर्वांनी लवकरात लवकर लसीकरण करावे असे आवाहनही केले आहे.
 
 
 
 
 
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, 'लवकरात लवकर लस घ्या. सुरक्षित रहा.' तसेच, ईशांत शर्मा आणि त्याची पत्नी यांनी देखील लसीकरण केंद्राबाहेरचा सेल्फी अपलोड केला. इशांतने आपल्या ट्विटरवर लिहिले, "मी याबद्दल आभारी आहे, सुविधा आणि व्यवस्थापन सुरळीत चालू आहे हे पाहून आनंद झाला. सर्वांनी शक्य तितक्या लवकर लसीकरण करा."
 
 
तसेच, याआधी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि सलामीवीर फलंदाज शिखर धवन यांनीदेखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. इंग्लंडसोबत ५ कसोटी सामन्यांची मालिका तसेच, न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@