डाळ सडली तरी चालेल, पण वाटप करणार नाही; ठाकरे सरकारचे धोरण

    दिनांक  01-May-2021 13:50:34
|
Dal_1  H x W: 0राज्यात ६ हजार मेट्रीक टन डाळ वाटपाविना पडून – रावसाहेब पाटील दानवे
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारतर्फे महाराष्ट्रास पंतप्रधान गरिब कल्याण योजनेंतर्गत १ लाख १३ हजार ०४१ मेट्रिक टन डाळ पुरविण्यात आली होती. मात्र, पवारपुरस्कृत ठाकरे सरकारच्या निष्काळजीपणामुळे अद्यापही ६ हजार ४४१ मेट्रिक टन डाळ वाटपाविना पडून आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी या प्रकाराची माहिती दिली आहे.
 
 
 
केंद्र सरकारने करोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये देशाची खाद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर आणि आत्मनिर्भर भारत योजना- ANB अंतर्गत मे आणि जून साठी लागू केली होती. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने मध्ये "राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा” अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी पाच किलो गहू अथवा तांदूळ तसेच एक किलो डाळ, एप्रिल ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत देण्यात आले होते. तसेच, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत जे प्रवासी कामगार दुसऱ्या राज्यांमध्ये अडकलेले होते त्यांना प्रति व्यक्ती ५ किलो अन्नधान्य आणि एक किलो डाळ देण्यात आली.
 
 
 

letter_1  H x W 
 
 
आत्मनिर्भर भारत अंतर्गत १,७६६ मेट्रिक टन दाळ आणि पंतप्रधान गरिब कल्याण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात राज्याला १,११,३३७ मेट्रिक टन डाळ दिली. अशी एकून १,१३,०४१ मेट्रिक टन डाळ महाराष्ट्राला दिली होती, परंतु राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे एकुन ६,४४१ मेट्रिक टन इतकी डाळ शिल्लक राहिली. ही बाब राज्य सरकारने ६ एप्रिल २०२१ रोज़ी केंद्र सरकारला संगितली. त्यावर केंद्र सरकारने त्वरित कारवाई करत १५ एप्रिल २०२१ रोजी राज्य सरकारला ही डाळ त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यासाठी सांगितले.
 
 
आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत (ANB) प्रवासी मजुरांसाठी भारत सरकारने महाराष्ट्र राज्याला ३,३४० मेट्रिक टन इतकी डाळ दिली. परंतु महाराष्ट्र राज्याच्या मागणीनुसार त्यांना अतिरिक्त १,७६६ मेट्रिक टन इतकी डाळ पुरवण्यात आली. राज्य सरकार ने त्यापैकी केवळ १,२४८ मेट्रिक टन इतकीच डाळ वाटप केली होती.
 
 
 
 

raosaheb_1  H x
 

महाविकास आघाडीचा निष्काळजीपणा संतापजनक – रावसाहेब पाटील दानवे
 
 
महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारने डाळीच्या वितरणाची परवानगी दिली असताना इतकी डाळ शिल्लक राहणे यातून महाविकास आघाडी सरकारचा निष्काळजीपणा स्पष्ट होतो., वितरण न केल्यामुळे आज राज्यात ठिकठिकाणी ही डाळ खराब होण्याची माहिती समोर येत आहे. या नुकसानीस महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे, असे ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे म्हणाले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.