स्पुतनिक व्ही लसीची पहिली खेप भारतात दाखल

01 May 2021 18:33:51

sputanik v_1  H



हैद्राबाद :
देशात लसींची कमतरता जाणवत असल्याने भारताने रशियाकडून स्पुतनिक व्ही या लसींचा साठा मागवला असून या लसींची पहिली खेप भारतात आली आहे. दीड लाख स्पुतनिक व्ही लसीचे डोस भारतात दाखल झाले असून हैदराबाद विमानतळावर लसी घेऊन आलेले विमान पोहोचले आहे. रशियाकडून या महिन्यात भारताला आणखी ३० लाख लस मिळणार आहेत. स्पुतनिक व्ही ही लस ९१.६ टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचा दावा केला जात आहे.

स्पुतनिक व्ही व्हॅक्सिन डॉ. रेड्डी यांच्या लॅबोरेटरीजमध्ये पाठवण्यात येणार आहे. १३ एप्रिल रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुतनिक व्हीच्या एमर्जन्सी वापरण्यास मंजुरी दिली आहे. स्पुतनिक व्हीला मंजुरी देणारा भारत हा जगातील ६० वा देश बनला आहे. भारतात स्पुतनिक व्हीचे दरवर्षी ८५ कोटीहून अधिक डोस तयार करण्यात येणरा आहेत, असं रशियाने म्हटलं आहे. या व्हॅक्सिनचे वैज्ञानिक परीक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. भारतातील या लसीचे वैज्ञानिक परीक्षण सकारात्मक आहे. भारतात डॉ. रेड्डीज यांच्या मदतीने हे परीक्षण करण्यात आले आहे.



देशात कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लस उपलब्ध आहेत. भारत बायोटेकची कोवॅक्सिनची प्रभावित ८१ टक्के आहे. त्याच वेळी सीरम इन्स्टिट्यूट (एसआयआय) द्वारा निर्मित कोविशिल्डची कार्यक्षमता ८० टक्क्यांपर्यंत आहे. आता रशियन लसीनंतर स्पुतनिक व्ही ही भारतातील एकमेव लस असेल, ज्याची प्रभावशीलता ९० टक्क्यांहून अधिक आहे. दीड लाख स्पुतनिक व्ही लसीचे डोस भारतात दाखल झाले असून हैदराबाद विमानतळावर लसी घेऊन आलेले विमान पोहोचले आहे. रशियाकडून या महिन्यात भारताला आणखी 30 लाख लस मिळणार आहेत.
Powered By Sangraha 9.0