देशात ३ लाख,८६ हजार, ४५२ नवे ‘कोरोनाग्रस्त’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-May-2021
Total Views |

news 1 _1  H x


नवी दिल्ली : आतापर्यंत भारतात एकूण १ कोटी, ५३ लाख, ८४ हजार, ४१८ ‘कोविड’ रुग्ण पूर्ण बरे झालेले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ८१.९९ टक्के इतका आहे. गेल्या २४ तासांत देशभरात २ लाख, ९७ हजार, ५४० रुग्ण बरे झाले. दहा राज्यांत मिळून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.६१ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ३ लाख, ८६ हजार, ४५२ नवे कोरोनारुग्ण आढळले.
 
सध्या भारतात ३१ लाख, ७० हजार, २२८ कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील एकूण ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांचे प्रमाण १६.९० टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांत त्यात ८५,४१४ नव्या रुग्णांची भर पडली. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ७८.१८ टक्के रुग्ण ११ राज्यांत आहेत. राष्ट्रीय मृत्यूचे प्रमाण सध्या १.११ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासांत देशभरात ‘कोविड’मुळे ३,४९८ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंपैकी ७७.४४ टक्के मृत्यू दहा राज्यात झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ७७१ मृत्यू झाले, तर त्या खालोखाल दिल्लीत ३९५ जणांचा मृत्यू झाला. चार राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात गेल्या २४ तासांत एकाही ‘कोविड’ मृत्यूची नोंद नाही ही राज्ये म्हणजे दीव-दमण, दादरा नगरहवेली, नागालॅण्ड, त्रिपुरा आणि अंदमान-निकोबार बेटे आहेत.
 
भारतात आतापर्यंत १५.२२ कोटींहून अधिक नागरिकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांत २१ लाखांहून अधिक लोकांना लसींच्या मात्रा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यासाठी आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत २.४५ कोटींहून अधिक नागरिकांनी ‘कोविन’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. दि. २८ एप्रिलपासून ही नोंदणी सुरू झाली असून पहिल्या दिवशी १.३७ कोटी लोकांनी तर त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे दि. २९ एप्रिलला १.०४ कोटींपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती.


@@AUTHORINFO_V1@@