लसीकरणाचा डेटा कुठेय! नुसता जीवघेणा खेळ सुरू : वैभव जोशी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Apr-2021
Total Views |

Joshi _1  H x W



मुंबई : सध्या राज्य व केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेल्या लसीकरणाबद्दलच्या आरोप प्रत्यारोपावर लेखक, कवी वैभव जोशी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणतात, "राज्याला पुरवण्यात आलेल्या लशी आणि वापरल्या गेलेल्या लशी ह्यात इतकं गूढ काय आणि का आहे? सरळ सरळ माहिती का तोंडावर मारत नाहीत दोन्ही जण?? कुठेतरी डेटा असेलच ना?, असे म्हणत हा कीती, किती क्रूर आणि जीवघेणा खेळ सुरू आहे!!!, असा संताप व्यक्त केला आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
 
 
 
यावर हृषिकेश जोशी या प्रकरणावर प्रतिक्रीया दिली आहे. "यांनी नक्की लशी किती आल्यात आणि किती हव्या आहेत हे खरं खोटं नागरिक म्हणून कळायला हवंच आहे. (मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात वा बाजूने नाही.) पण अगदीच स्पष्ट बोलायचं तर, लोकांच्या समजुतींचा 'पेंड्युलमपण' लक्षात घ्यायला हवा. लस आली तेंव्हा तिच्यावर केवळ राजकारणापायी लोकांनीच आधी इतक्या शिव्या घातल्या; अविश्वास दाखवला. हजारो लोकांकडून मी प्रत्यक्ष ऐकलंय की, "घ्यायचे ते घेतील, मी काहीही झालं तरी लस घेणार नाहीये".
 
 
"मग 'सरकार ती कम्पल्सरी करेल का'? 'हा पैसे काढण्याचा उद्योग नसेल कशावरून'? 'लस घेऊनही कोरोना होणार नाही हे सरकारनं लिहून द्यावं'; जे आत्ता घडताना दिसतंच आहे; तरीही, आधी लसीच्या विरोधातले तेच लोक आता लस केंद्र सरकार पाठवत नाहीये म्हणून बोंब मारतायत. या महिन्यात आकडे वाढत गेले आणि भीतीदायक परिस्थिती निर्माण झाल्यावर पळापळ झाली. मग 16 जानेवारीला लस आल्यावर सुरुवातीचे कोव्हीड योद्धे, सिनियर सिटीझन्स वगैरेंच्या नियमावलीनंतर मागच्या महिन्यात किती जणांनी या लशींसाठी पुढाकार घेऊन नावं नोंदवली, आणि प्रत्यक्ष लस घेतली? तेंव्हा लशी अक्षरशः पडून होत्या.", असे मत त्यांनी नोंदविले आहे.
 
 
आपल्या प्रतिक्रीयेत ते म्हणतात, "आज ज्या प्रमाणात आवाज ऐकू येतोय त्याप्रमाणात का नाही लोक स्वतःहून लस घायला गेले? याचा अर्थ आत्ता ती मिळत नाहीये याचं कसलंही समर्थन होऊ शकत नाही. पण आपण सुद्धा नागरिक म्हणून वणवा पेटल्यावर विहिरी खणायला घेतो. दिवस बदलला की लोकांचे निर्णय आणि वक्त्यव्य सतत बदलतात. मुळात लसीच्या बाबतीत असंख्य विचारधारा आहेत आणि त्या ही ठाम नाहीत. वर त्या काळानुसार सतत बदलतायत. आत्ताही "मुळात कोरोना नाहीचेय"; "हा राजकीय कोरोना आहे"; यावर काही जनता ठाम असताना प्रत्यक्ष हजारो पेशंट्स दवाखान्यात आहेत; काही व्हेंटीलेटर्स वर आहेत; काही गेले. मुळात कोरोना नक्की आहे? की नाहीचेय? या संभ्रमात असलेली जनता करोडोने आहे."
 
 
"कशाचाच कशाला ताळमेळ नाही. शंभर दिशेने शंभर भिन्न टाहो आहेत. लॉकडाऊन लावला तर वेगळी बोंब आहे; नाही लावला तर निराळी बोंब आहे. त्यात बाहेरून सतत वेगवेगळे संशोधनाचे, भीतीचे, कार्यप्रणालींचे, नियमांचे भलभलते निष्कर्ष माध्यमात येत राहतात. इकडे ताबडतोब त्यावर काथ्याकूट सुरु होतो. आणि लोक फक्त शिव्या देण्यात धन्यता मानतात. काहीतरी कशाततरी सुसूत्रता आणायला हवी. नुसत्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे शिव्या देऊन काहीच हाताला लागणार नाहीये.", असे मत सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी मांडले आहे. ही कमेंट त्यांनी वैभव जोशी यांच्या फेसबूक वॉलवर केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@