'एमपीएससी'बद्दल ठाकरे सरकारचा महत्वाचा निर्णय

09 Apr 2021 17:49:21

CMO.jpg _1  H x
 

 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली बैठक

मुंबई : MPSC Exam 2021 Postponed महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने कोरोना विषाणूचा वाढता कहर पाहून २०२१ ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. एमपीएससी (MPSC) परीक्षा २०२१ पूर्वी ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. पूर्वी ११ एप्रिल रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अद्याप नव्या तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात उद्भवलेली गंभीर परिस्थिती पाहता कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
एमपीएससी ( MPSC) परीक्षा आयोजनानुसार, ठोस निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठकत घेण्यात आली. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेत्यांची बैठक झाली. यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती पाहता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.



Powered By Sangraha 9.0