IPL Opening ceremony 2021 : होणार का ? : पहा कसा आहे 'माहोल'?

    दिनांक  09-Apr-2021 18:54:11
|
MI VS KKR _1  H


मुंबई : आयपीएलचा २०२१ वर्षाचा सिझन ९ एप्रिलपासून सुरू झाला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १४ व्या सिझनमध्ये स्वागत सोहळा (IPL Opening ceremony 2021 ) नसणार आहे. बीसीसीआयतर्फे पहिल्यांदाच काही विशेष व्यक्तींनाच सामना पाहण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (IPL 2021) या संघांमध्ये होणारा हा पहिला सामना चेन्नईतील चिदंबरम स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे.
 
 
 
यूएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० मध्येही स्वागत सोहळा झाला नव्हता. यंदा आयपीएल गवर्निंग काऊन्सिलतर्फे पहल्यांदा विशेष लोकांना बोलावलं आहे. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाला बीसीसीआय सचिव जय शाह यांना स्वागत समारंभासाठी बोलावले आहे. त्या शिवाय व्हीलचेयर क्रिकेट इंडियालाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. प्रसिद्धी माध्यमांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. कोरोनाची परिस्थिती सामान्य झाली तर माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यावर निर्णय घेतला जाईल. बीसीसीआय प्रसार माध्यमांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रेस कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
 

 
 
 
होम ग्राऊंडचा फायदा संघाला होणार नाही
 
 
कोरोनामुळे आयपीएल यंदा केवळ सहा जागांवरच खेळवली जाणार आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद या ठिकाणीच सामने होणार आहेत. अंतिम सामना ३० मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या वर्षी कुठल्याही संघाला होम ग्राऊंडचा फायदा होणार नाही. कारण कुठलीही टीम ही घरच्या मैदानात खेळत नाही. मुंबईला सर्वात जास्त सामने एम. एस. धोनीच्या चेन्नईत खेळावे लागणार आहेत.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.