"मुस्लीम समाजामध्ये लसीकरणाचा दर कमी; तो वाढला पाहिजे"

    दिनांक  07-Apr-2021 12:53:19
|
rajesh tope_1  मुंबई (प्रतिनिधी) -
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आॅक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला विनंती केली आहे. आसपासच्या राज्यांमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांना केली आहे. मुस्लीम बांधवांसोबत चर्चा करून त्यांच्यामध्ये असलेल्या लसीकरणाच्या गैरसमजुती दूर केल्याचे ते म्हणाले.
 
 
 
राज्यात कोरोना लसीकरणाने वेग पकडला आहे. मात्र, राज्यात या लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनासंदर्भातील इतर आरोग्य समस्यांबाबत टोपेंनी मंगळवारी डाॅ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्याला काही गोष्टींबाबत मदत करण्याची विनंती डाॅ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. राज्यात लसीकरणाचा वाढलेला वेग पाहता दर आठवड्याला ४० लाख लसीचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले. तसे झाल्यास दररोज सहा लाख लसीकरणाचा टप्पा आपण पूर्ण करू शकतो. त्यासाठी केंद्र सरकाराने 'कोव्हिशिल्ड' लसीचा पुरवठा करण्याची विनंती टोपे यांनी केली.
 
 
 
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली. यासाठी आसपासच्या राज्यांमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात टोपे यांनी डाॅ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. '' 'रेमडेसिवीर' इंजिक्शनच्या पुरवठ्य़ावर केंद्राने लक्ष ठेवून त्यांची किंमत १,१०० ते १,४०० रुपयांदरम्यान करण्याचा निर्णय लवकरच घेणार,'' असे ते म्हणाले. राज्यात ४५ वर्षांवरील लोकांना लस घेणे बंधनकारक आहे. तसेच २० ते ४० वयोगटातील लोकांना लस देण्यासाठी परवानगी देण्याची मागणी पुन्हा एकदा डाॅ. हर्षवर्धन यांना टोपेंकडून करण्यात आली. तसेच मुस्लीम समाजमध्ये कोरोना लसीकरणाच्या संदर्भात काही गैरसमजुती आहेत. त्या दूर करण्यासंदर्भात टोपे यांनी मंगळवारी मुस्लीम बांधवांशी चर्चा केली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.