वाझे 'त्या' महिलेला ५ वर्षांपासून ओळखत होता ; नव्या व्हिडिओतून खुलासा

    दिनांक  07-Apr-2021 18:24:24
|

sachin waze_1  


मुंबई :
अन्टेलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे प्रकरणात एनआयएच्या तपासात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एनआयएने दमन याठिकाणाहून एक बाईक ताब्यात घेतली आहे, जी एका महिलेच्या नावाने रजिस्टर आहे. हीच ती मिस्ट्री वुमन आहे का ? याबाबत आता एनआयए तपास करत आहे. एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात वाझे लक्झरी इटालियन बाईक बेनेली चालविताना दिसतोय. ही गाडी एनआयएने दमन याठिकाणाहून ताब्यात घेतली आहे.

मनालीला ट्रीपला गेले असताना या गाडीचे टायर पंक्चर झाले होते


एका व्हिडिओत सचिन वाझे आणि काही मुलं एका ठिकाणी थांबताना दिसतात. व्हिडीओमध्ये एक मुलगा सचिन वाझेबद्दल बोलताना दिसत आहे. त्याने सांगितले की आमच्या एका दुचाकीचा टायर खराब झाला आहे. आम्ही सर्व जण मनालीच्या दिशेने जात आहोत. हा मुलगा बाईकचे फाटलेले टायरदेखील दाखवतो.

निलंबनादरम्यान बाईक क्लबच्या माध्यमातून वाझेच हजारो किलोमीटरचा प्रवास


निलंबित असताना मुंबईतील बाइकर क्लबमध्ये वाझे सामील झाला होता आणि या दुचाकीसह त्याने हजारो किलोमीटरचा प्रवास केल्याचे एनआयएच्या तपासणीत समोर आले आहे. त्याने प्रवास केलेल्या बाइक्सपैकी बेनेलीही आहे. त्याची किंमत सुमारे ८ लाख रुपये इतकी आहे.


ही दुचाकी वाझेच्या मैत्रिणीच्या नावावर रजिस्टर आहे


जप्त लक्झरी दुचाकी मुंबईतील एनआयएच्या कार्यालयात आहे. पुण्यातुन गेलेली फॉरेन्सिक टीम याचा तपास करीत आहे. मीना जॉर्ज नामक महिलेच्या नावावर ही बाईकची रजिस्टर आहे, मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या बाईकचे पैसे वाझेने दिले आहे. मीनाला एनआयएने ठाण्यातील एका फ्लॅटमधून अटक केली. जेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिला भेटल्याचे दिसून आले तेव्हा तिच्यावर एजन्सीचे लक्ष होते. मीना एक नोट मोजणी यंत्रासह सचिन वाजे यांना भेटण्यासाठी मुंबईतील हॉटेल ट्रायडंट येथे गेली होती.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.