'हा माझ्या बदनामी आडून सरकारच्या बदनामीचा डाव'

    दिनांक  07-Apr-2021 19:25:33
|

anil parab_1  Hमुंबई
: सचिन वाझेंनी एनआयए कोर्टात न्यायालयाला दिलेल्या पत्रात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी २ कोटी रुपये मागितले, असा आरोप केला आहे. यावेळी वाझेने पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीतील मंत्री अनिल परब यांची नाव पत्रात घेतली आहे. मात्र, मंत्री अनिल परब यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे खंडन करत 'हा माझ्या बदनामी असून सरकारच्या बदनामीचा डाव' असल्याचे म्हणत मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हणले आहे. पत्रकार परिषद घेत अनिल परब यांनी याबाबत माहिती दिली.

अनिल परब म्हणतात,"माझ्यावर झालेले दोन्हीही आरोप मी नाकारत आहे. मी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. माझ्यावर खंडणीची कोणतेही संस्कार आहेत. मी शपथ घेऊन सांगतो हे सर्व खोटं आहे. गेले २-३ दिवस भाजपचे लोक आम्ही याप्रकरणात तिसरा बळी घेऊ त्याचा अर्थ त्यांना २-३ दिवसांपासून हे प्रकरण शिजवलं आहे किंवा तयार केले आहे. सचिन वाझे आज पात्र देणार हे भाजपला आधीपासूनच माहित असावे. म्हणून त्यांनी आधीपासून या प्रकरणाचा गाजावाजा केला. आणि केंद्रीय पथकाला हाताशी घेऊन भाजपने अनिल देशमुख, मी आणि अजित पवारांचे जवळचे संबंध असणारे घोनावर यांच्यावर आरोप करण्यात आले आहे.महापालिकेतील कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरशी माझे जवळचे संबंध नाही त्यामुळे मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रातही याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्याच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्यासाठी म्हणून भाजपने हा डाव रचला आहे. कुठल्याही चौकशीला सामोरे जायला मी तयार आहे, असे अनिल परब म्हणाले. पुढे ते म्हणाले, सीबीआय, रॉ किंवा नार्को टेस्ट करायचीही माझी तयारी आहे. हा माझ्या बदनामी आडून सरकारच्या बदनामीचा डाव",असल्याचे अनिल परब म्हणाले.

वाझेने पत्रात केलेले आरोप...


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सेवेत आल्यानंतर मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूही वसुली करण्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझे यांच्या पत्रात करण्यात आलाय. माझी पोस्टिंग सीआययु युनिटमध्ये झाली नंतर २ ऑगस्ट २०२०मध्ये मंत्री अनिल परब यांनी मला त्यांच्या कार्यालयीन बंगल्यावर बोलावले . त्यांनी एसबीयु ट्रस्टच्या तक्रारीत मला लक्ष घालण्यात सांगितले. आणि ट्रस्टींना वाटाघाटीसाठी घेऊन या असेही सांगितले. ट्रस्टींकडून तक्रार मागे घेण्यासाठी ५० कोटींची प्राथमिक बोलणी करण्यासही सांगितल्याचे. मी त्यांना सांगितलं की एवढे पैसे देऊ शकत नाही. तर यावर त्यांनी नंतर पैसे देण्यास सांगितले. जानेवारी २०२१ मध्ये अनिल परब यांनी मला पार्ट बोलावले. आणि बीएमसीच्या फ्रॉड कंत्राटदाराच्या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले.आणि अशा ५० कंत्राटदारांकडून २ कोटी रुपये घेण्यास सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.