शिवसैनिक प्रदीप शर्मा 'एनआयए' कार्यालयात : वाझे प्रकरण भोवणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Apr-2021
Total Views |

pradip sharma _1 &nb
 
 

सचिन वाझेने घेतले प्रदीप शर्मांचे नाव ?

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा बुधवारी एनआयए कार्यालयात दाखल झाले. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) परमबीर सिंग यांचीही चौकशी करत आहे. सचिन वाझेची नियुक्ती आणि इतर विषयांवर परमवीर सिंह यांना प्रश्न विचारले गेले आहेत आता शर्मा यांची चौकशी एनआयएने सुरू केली आहे.
 
 
शिवसेना नेते व माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने चौकशीसाठी समन्स बजावला आहे. मनसुख हिरण प्रकरणात वाझेंची चौकशी होत असताना आता शर्मा यांचीही चौकशी होणार आहे. प्रदीप शर्मा हे नालासोपारा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर २०१९ मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, शर्मा यांचा मोठा पराभव झाला होता.
 
 
प्रदीप शर्मांना चौकशीसाठी का बोलावलं ?
 
सचिन वाझे प्रकरणात प्रदीप शर्मांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. १९८३ मध्ये दाखल झालेले प्रदीप शर्मा यांची कारकीर्द कायम वादात राहिली. ८०-९० च्या दशकात मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांनी हातपाय पसरले असताना, अंडरवर्ल्ड राज संपवण्यासाठी पोलिसांनी एन्काऊंटर मोहिम हाती घेतली होती. प्रदीप शर्मा यांनी ३१२ एन्काऊंटरमध्ये भाग घेत, शंभरहून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केलं आहेत.
 
रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचे बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध या आरोपातून शर्मा यांना २००८ मध्ये पोलिस दलातून निलंबित करण्यात आले. लखन भय्या एन्काऊंटर प्रकरणी शर्मा यांच्यासह १३ जणांना अटकही करण्यात आली. मात्र, २०१३ मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची या आरोपातून मुक्तता केली. तेलगी बनावट मुद्रांक प्रकरणातील आरोपांतूनही त्यांची मुक्तता झाली.आपल्याला पुन्हा सेवेत रुजू करुन घ्यावं, यासाठी शर्मा यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागितली होती. अनेक महिने शर्मा यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
@@AUTHORINFO_V1@@