हायमीडिया लॅबोरेटरीजला प्रतिष्ठित 'बी.आय.आर.ए.सी. इनोव्हेटर अॅवॉर्ड- २०२०' प्राप्त

    दिनांक  07-Apr-2021 11:47:36
|

news _1  H x W:


 गेल्या ४७ वर्षांपासून तब्बल १५० देशांमध्ये मीडिया उत्पादन आणि रोग-निदान या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणाऱ्या मीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड उद्योग समूहाला जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहाय्यता परिषद (बायरेक-भारत सरकारचा उपक्रम) तर्फे उपचारात्मक लसी आणि औषध वितरण या श्रेणीमधील 'बी.आय.आर.ए.सी. इनोव्हेटर अॅवॉर्ड-२०२०'(BIRAC Innovator Award 2020) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
 
 
'उच्च-मूल्य असलेल्या बायोसिमिलरच्या उत्पादनासाठी वाजवी व रासायनिकरीत्या परिभाषित सीरममुक्त मीडिया आणि फिडचे संकल्पन आणि व्यावसायीकरण' या संशोधन प्रकल्पामध्ये हायमीडिया लॅबोरेटरीज बरोबर रासायनिक तंत्रज्ञान संस्था (Institute of Chemical Technology, ICT), मुंबई यांचेही महत्त्वपूर्ण योगदान आहे. या नूतनीकरणामुळे भारताला आयातीत, जैविक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या मीडिया आणि फीडच्या तुलनेत जागतिक दर्जाच्या मीडिया आणि फीड उपलब्ध करण्यास मदत होईल. पेशी जीवशास्त्र विभागाचे संचालक डॉ. विशाल जी. वारके आणि डॉ. प्रीती व्ही. वारके यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या संशोधन प्रकल्पाची अंमलबजावणी झाली.
 
 
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री तसेच वसुंधरा; विज्ञान; आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन. सी.आय.आय., अध्यक्ष उदय कोटक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बायोकॉन लिमिटेड डॉ. किरण मजुमदार आणि भारताचे जागतिक आरोग्य संघटना प्रतिनिधी डॉ. रॉड्रीको एच. ऑफ्रिन यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
पुरस्काराचे वितरण ३ मार्च, २०२१ रोजी ग्लोबल बायोइंडिया-२०२१ दरम्यान एका आभासी सोहळ्याद्वारे करण्यात आले. पुरस्कारांची निवड जैविक तंत्रज्ञान विभागातर्फे (डी.बी.टी.) सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या देखरेखीखाली नियुक्त केलेल्या ख्यातनाम पंचामार्फत करण्यात आली.
 
 
समारंभाच्या उद्घाटन प्रसंगी बी.आय.आर.ए.सी च्या अध्यक्षा डॉ. रेणू स्वरूप म्हणाल्या ''नवकल्पना प्रारंभ, इन्क्युबेटर हे देशाच्या जैव पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. आम्हाला विश्वास आहे की, हे केवळ जैविक प्रणालीलाच प्रोत्साहित करणारे नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'आत्मनिर्भर भारत' या अभियाना अंतर्गत येणाऱ्या काळात उत्कृष्ट दर्जाचे योगदान देणारे ठरेल.''
 
 
पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन करताना माननीय उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू म्हणाले ''जैविक तंत्रज्ञानाने अलीकडच्या काळात आरोग्य सेवा, औषधी सेवा आणि अन्नप्रक्रिया अशा विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. यामुळे मानवी जीवनाच्या गुणवत्तेचा स्तर उंचावण्यास मदत झाली आहे.'' त्यांनी असेही नमूद केले की, ''जैविक तंत्रज्ञान क्षेत्रांमधील जागतिक अग्रगण्य १२ स्थानांमध्ये भारताचा समावेश आहे.''
 
हायमीडिया विषयी:
 
हायमिडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय कंपनीची स्थापना करणारे माननीय डॉ. जी. एम. वारके हे सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणी व वनस्पती जीवशास्त्र, आनुवंशिक शास्त्र, रसायने, संशोधन उपकरणे अशा विविध क्षेत्रांमध्ये नावाजलेले तज्ञ आहेत. जागतिक स्तरावरील दर्जेदार उत्पादने वाजवी दरात भारतीय वैज्ञानिकांना उपलब्ध करून साहाय्य करणे हे चार दशकांपूर्वी स्थापन झालेल्या या संस्थेचे स्थापनेपासूनचे मुख्य उद्दिष्ट आहे.
 
सूक्ष्मजीवशास्त्र मीडिया उत्पादन करणान्या तीन जागतिक अग्रगण्य संस्थांमध्ये समावेश असणारी हायमीडिया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था सुमारे १५० देशांमध्ये विविध उत्पादने निर्यात करते. संशोधन आणि विकास हा प्रमुख पाया असलेली ही संस्था आपल्या नफ्यामधील महत्त्वपूर्ण वाटा संशोधनात गुंतवते. व्यवस्थापनेच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या संशोधक आणि तज्ज्ञांच्या बळावर हायमीडिया यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे. हायमीडियाचे आधुनिक उत्पादन क्षमतेने अद्ययावत असणारे सुमारे ८ कारखाने विविध ठिकाणी कार्यान्वित आहेत. अधिक माहितीकरिता www.himedialabs.com या संकेतस्थळावर भेट देणे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.