विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी : ९ वी आणि ११ वीच्या परीक्षा रद्द

    दिनांक  07-Apr-2021 18:25:28
|

Exams_1  H x W:
 
मुंबई : सध्या राज्यभरात कोरोनाचा कहर पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. अशामध्ये शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी आणि पालकांचे मात्र अतोनात हाल होत आहेत. अशामध्ये आता मार्च - एप्रिलमध्ये परीक्षांचा हंगाम सुरु होत असतना सर्वांसमोर मोठा प्रश्न पडला होता. मात्र, आता पहिली ते आठवी प्रमाणेच नववी आणि ११वीच्या परीक्षादेखील घेण्यात येणा नाहीत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
 
 
 
 
राज्यात मिनीलॉकडाऊन लावण्यात आला असून परीक्षांवर देखील कोरोना संकट असल्याचे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना सरसकट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ९ वी आणि ११ वीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देखील परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. आता ९ वी आणि ११ वीची देखील परीक्षा होणार नसून, त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.