मुंबईत 'सीबीआय' परमवीर सिंह यांना 'हे' १० प्रश्न विचारू शकते

06 Apr 2021 15:08:21

cbi_1  H x W: 0




मुंबई :
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्याच्या आरोपाच्या चौकशीसाठी काळ मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश येताच 'सीबीआय' सक्रिय झाली आहे. 'सीबीआय'चे पथक आज मुंबईत दाखल होईल आणि माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची चौकशी करेल.



मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणाची 'सीबीआय' चौकशीचे आदेश दिले. या निर्णयानंतर काही तासांतच अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. या भेटीनंतर 'सीबीआय'च्या तपासाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अनिल देशमुख अपील करू शकतात.



'एसीबी'ने अभिषेक दुलार यांच्या नेतृत्वाखालील 'सीबीआय' टीम


'सीबीआय'ची एक टीम मुंबईत दाखल होणार आहे. या संघाचे नेतृत्व हिमाचल प्रदेश केडरच्या २००६ बॅचचे 'आयपीएस' अधिकारी अभिषेक दुलार करत आहेत, असा विश्वास आहे की ही टीम प्रथम परमवीर सिंह यांच्या वक्तव्याची नोंद घेईल. आयआयटी दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या दुलार यांनी राज्य दक्षता आणि 'अॅन्टी करप्शन ब्यूरो'ची जबाबदारी सांभाळली आहे. ते शिमला, मंडी आणि कुल्लूचे पोलीस अधीक्षक राहिले आहेत. केवळ व्हीजलन्स विभागातील त्यांचे उल्लेखनीय काम पाहता या प्रकरणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
 

'हे' १० प्रश्न 'सीबीआय' परमवीर सिंह यांना विचारू शकते

१. १०० कोटी वसुलीची माहिती तुम्हाला कधी व कशी मिळाली, सविस्तर सांगा ?

२. सचिन वाझेचे प्रकरण उघडकीस येताच तुम्ही पहिले पाऊल काय उचलले ?


३ . आपण हे वसुली प्रकरण थांबविण्याचा प्रयत्न केला की नाही? आपण कोणतीही 'एफआयआर' किंवा तक्रार का दिली नाही?


४. सचिन वाझेला १ वर्ष निलंबित केल्यावर कोणत्या आधारावर पुन्हा सेवेत घेण्यात आले ? त्यामध्ये तुमची काय भूमिका होती?


५. गुन्हे शाखेत अनेक वरिष्ठ असूनही 'सीआययु'चे प्रमुखपद वाझे यांना का देण्यात आले?


६. प्रोटोकॉल नियम मागे टाकून वाझे थेट तुम्हाला का रिपोर्ट करत होते?


७. ते पुन्हा रुजू होताच अनेक महत्त्वपूर्ण केसेस तुम्ही ताबडतोब त्यांच्याकडे का दिल्या?


८. साहाय्यक पोलीस निरीक्षक असूनही वाझेच्या प्रभावाबद्दल तुम्हाला कधीच संशय आला नाही?


९. अॅन्टिलिया प्रकरणाची माहिती मिळताच ज्यूरिडिक्शन नसतानाही वाझेकडे तपास का सोपविण्यात आला?


१०. सचिन वाझे यांना विशेष अधिकार देण्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव होता का?

Powered By Sangraha 9.0