मनसुख हत्या प्रकरण : हत्येपूर्वी ट्रेनने ठाण्यात गेला सचिन वाझे

06 Apr 2021 16:12:36

Antillia_1  H x
 


मुंबई
: अॅन्टिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणाचा तपास 'एनआयए' करत आहे. तपासादरम्यान 'एनआयए'च्या हाती अनेक 'सीसीटीव्ही फुटेज' लागले आहेत. यातील एक फुटेज सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) स्थानकातील आहे. ज्या दिवशी मनसुख हिरनची हत्या झाली, त्या दिवशी सचिन वाझेने 'सीएसएमटी' ते ठाणे, असा लोकलने प्रवास केला होता. सोमवारी रात्री या प्रवासाचे 'रिक्रिएशन' करण्यात आले. सोमवारी रात्री ११ ते ११ वाजून ४५ मिनिटांदरम्यान हे 'रिक्रिएशन' करण्यात आले.
 
 
 तसेच, आता या प्रकरणात एका स्पोर्ट्स बाईकचादेखील उल्लेख होत आहे. ही बाईक मीना जॉर्ज या नावावर आहे. काही दिवसांआधी 'एनआयए'ने मीना जॉर्ज यांना अटक करून त्यांची चौकशी केली होती. मीना ही तीच महिला आहे, जी नोटा मोजायची मशीन घेऊन सचिन वाझेला भेटण्यासाठी ट्रायदंड हॉटेलला गेली होती. 'सीसीटीव्ही'च्या आधारे 'एनआयए'ला या विरोधात पक्के पुरावे मिळाले आहेत. यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
 
Powered By Sangraha 9.0