ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल पालये यांचे निधन

    दिनांक  06-Apr-2021 13:24:37
|

rss badalapur_1 &nbsबदलापूर:
बदलापूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनिल पालये यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून आणि दोन बहिणी, असा परिवार आहे. प्रगल्भ विचारांचे पुरस्कर्ते, नव्या विचारधारेने समाज प्रबोधन करणारे आणि सदा हसतमुख असे पालये यांचे व्यक्तिमत्त्व होते.


जनसंघापासून कायम अव्याहतपणे संघविचार, प्रचार आणि प्रसाराची धुरा अनिल पालये यांनी समर्थपणे सांभाळली होती. डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या सेवेतून अनिल पालये सेवानिवृत्त झाले होते. वृत्तपत्रलेखनाची आवड जोपासणार्‍या अनिल पालये यांची विविध विषयांवर भाष्य करणारी त्यांच्या अनेक पत्रांची विविध वृत्तपत्रांनी दखल घेऊन प्रसिद्धी दिली होती. वर्तमानपत्रातील कात्रणे त्यांनी संग्रहित ठेवली होती.


अयोध्या येथे श्रीराम मंदिर उभारणीचे भव्य काम सुरू झाल्यानंतर या मंदिराच्या उभारणीसाठी बदलापुरात निधी संकलन करण्याचे कार्य अनिल पालये यांनी केले, त्या कार्याला तोड नव्हती. अनिल पालये यांच्या निधनामुळे संघ परिवारात एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना रा. स्व. संघाकडून व्यक्त करण्यात आली.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.