जम्मू-कश्मीर: चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या रेल्वे पूलाच्या कमानीचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. ४६७ मी लांबीची ही किमान कोकण रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेडने बांधून पूर्ण केली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये या पूलाचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरला प्रगतीशील आणि समृद्ध राज्य करण्यासाठी केंद्र सरकार कसलीही कसर सोडत नाही आहे. त्याअंतर्गत जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे बांधकाम याठिकाणी सुरू आहे. या पुलाची उंची पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही मोठी आहे. जम्मू-काश्मीरच्या कौरी भागात हा जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल बांधला जात आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे जोड प्रकल्पांतर्गत १११ किमी लांबीच्या य मार्गावर अनेक ठिकाणी भोगदे आणि पूल बांधण्यात येत आहेत. त्यामध्ये चिनाब नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. या पूलाच्या ४६७ मीटर लांबीच्या भव्य कमानीचे काम सोमवारी पूर्ण झाले.
या चिनाब रेल्वे पुलाची उंची नदीच्या तळापासून ३५९ मीटर आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये स्थित आयफेल टॉवरची उंच ३२४ मीटर आहे. म्हणजेच आयफेल टॉवरपेक्षा हा रेल्वे पूल ३५ मीटर उंच असेल. या नदीवर बांधल्या जाणाऱ्या पूलाची लांबी १३१५ किलोमीटर असणार आहे. ८ रिश्टल स्केल तीव्रतेचा भूंकप झाल्यास किंवा अतितीव्र स्फोट झाल्यास या पूलावर त्याचा काही परिणाम होणार नाही.