समाजातील प्रत्येक व्यक्तीवर पर्यावरण रक्षणाचे दायित्व : सरसंघचालक

    05-Apr-2021
Total Views | 107

News _1  H x W:


सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे प्रतिपादन

 
हरिद्वार : “पर्यावरण रक्षण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक असून, समाजातील प्रबुद्ध आणि जागरूक लोकांनी या दिशेने आपापल्या सामर्थ्यानुसार सार्थक योगदान द्यावे,” असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. ते हरिद्वार येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पर्यावरण समितीच्या माध्यमातून आयोजित चर्चेला संबोधित करत होते.
 
 
डॉ. मोहनजी भागवत म्हणाले की, “पर्यावरणरक्षणाच्या कार्यात गती आणायला हवी. आपण किती तलाव खोदले आणि वृक्षलागवड केली, हे आपले सामाजिक दायित्व आहे. म्हणूनच आपले काम आणि कामाचे परिणाम समाजाला दाखवावे-सांगावे लागतील. गतिविधी प्रमुखांनी कार्य करतेवेळी स्वतःचा प्रचार टाळायला हवा. आपण राष्ट्रनिर्माण आणि मानवतेच्या सेवेत कार्यरत आहोत, याचा नेहमी अभिमान आणि समाधान बाळगा.”
 
 
ते म्हणाले की, “हिंदू परंपरेमध्ये निसर्गरक्षण निराळ्या पद्धतीने केले जाणारे काम नाही. आपल्यासाठी तो आयुष्याचा घटक आहे. ते आपल्या वैयक्तिक आणि समाजजीवनाच्या प्रत्येक पैलूत सामील आहे. पर्यावरणरक्षण आपल्यासाठी पुस्तकी ज्ञान किंवा बौद्धिक विचार-विमर्शाचे परिमाण नाही, तर निसर्गाच्या आपल्या स्वाभाविक प्रेमात ते सदासर्वदा समाविष्ट आहे.
 
पर्यावरणाची चर्चा करताना प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे की, हे सर्वच एक-दुसर्‍याशी संबंधित आहे. तुम्ही पाण्याची चर्चा करताना जंगलाला सोडू शकत नाही, मातीच्या समस्येवर काम करताना पाण्याला सोडू शकत नाही. हा एक पैलू असून, दुसरा पैलू समाजाच्या एकत्रित शक्तीचा उपयोग करण्याचा आहे. वैयक्तिक प्रयत्न महत्त्वाचे आहेत. परंतु, त्याला सामाजिक प्रयत्नांत रूपांतरित केले नाही, तर आपण आपले लक्ष्य प्राप्त करू शकत नाही,” असेही सरसंघचालक म्हणाले.
 
“लोभ पूर्ण करणे निसर्गाच्या आवाक्यात नाही. प्रत्येक गोष्टीची उपयुक्तता आणि योग्यता माहीत करून घेतल्यानंतरही मनातली भावना बदलायला नको. परंतु, सामान्य वर्तनात ते होत नाही, हाच मानवी स्वभाव आहे. निसर्ग, संस्कृती आणि समाजात आज काही उणिवा आहेत. पण, त्या काढता येतील. भारत विविधतेमध्ये एकतेच्या शक्तीसह जगात विविध संकटांचा सामना वर्षानुवर्षांपासून करून अढळतेने उभा आहे आणि पुढेही राहील.
 
विकास आणि पर्यावरण एकमेकांचे विरोधक नाही, असा विचार करून विकासाचा नवा इतिहास लहूया. इतिहासातही आपण जगात पहिल्या क्रमांकावर होतो, तरीही आपल्याकडे पर्यावरणाशी संबंधित कोणतीही समस्या नव्हती. इतिहासात आपण गेल्या सहा हजार वर्षांपासून शेती करून जगाला अन्न उपलब्ध करून दिले. तरीही आपल्याकडील जमीन कसण्यायोग्य आहे. आपण पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहोत आणि पर्यावरणाच्या विकासानेच सृष्टीचा विकास होऊ शकतो, याचा हा दाखला आहे.
 
मनुष्यरूपात आपणच सर्वात महान आहोत, या अहंकाराचा आपण त्याग करून पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. आपण आपले वर्तन बदलले तर नक्कीच पर्यावरणाची स्थिती बदलेल. पर्यावरण गतिविधीचे काम पर्यावरणाला दूषित करणार्‍या वर्तनाला बदलण्याचे आहे,” असे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले.
 
देव संस्कृत विद्यापीठाचे प्रा. उपकुलपती डॉ. चिन्मय पांडेय यावेळी म्हणाले की, “भारतीय सनातन परंपरेमध्ये कुंभमेळ्याच्या महत्त्वाला अमृत मंथनाच्या कथेशी जोडलेले आहे. संघर्षाच्या गाथेतूनच सौभाग्याची गंगा वाहते. समुद्रमंथनातही अमृताआधी विष बाहेर आले होते, तीच स्थिती आजही पर्यावरण रक्षणाबाबत झालेली आहे. आज पर्यावरणाच्या परिस्थितीवर विचार करणे गरजेचे आहे, कारण जगात प्रत्येक आठव्या व्यक्तीचा मृत्यू वायुप्रदूषणाने होत आहे. दरम्यान, सरसंघचालकांच्या हस्ते यावेळी पर्यावरण रक्षण गतिविधीचे मासिक ’ Paryavaran Perspective प्रकाशन करण्यात आले.

अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121