PHOTO : मुंबईच्या गर्दीत 'कोरोना' गुदमरुन मेला!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2021
Total Views |

1 1 _4  H x W:
 



मुंबई : 'जखम मांडीला मलम शेंडीला', असा काहीसा प्रकार राज्यात लागू करण्यात सोमवारी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर पहायला मिळाला. कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने रविवारी कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू केले जाणार आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केला जाणार आहे. मात्र, सोमवारी नेहमीप्रमाणेच चित्र मुंबईत पहायला मिळाले.
 
 

1 1 _3  H x W:  
 
 
दादर भाजी मार्केट संपूर्णपणे गर्दीने गजबजून गेले होते. मास्क न वापरणाऱ्यांची संख्याही लक्षणीय दिसून आली. बाजारपेठांमध्ये होत असलेली गर्दी पहाता कोरोना या निर्बंधांमुळे थांबणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसभर संचारबंदी लागू करण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले होते. मात्र, दादरच्या भाजी मंडईमध्ये वेगळेच चित्र दिसून येत आहे. लॉकडाऊन आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी खरेदीसाठी लगबग केल्याचे पहायला मिळाले.
 
 

1 1 _2  H x W:  
 
 
मुंबई लोकलमध्येही सोमवारी नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली. मुंबईतील परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने कठोर अंमलबजावणी करणेचे गरजेचे आहे, असे बोलले जात आहे. मुंबईतील लोकल, बाजारपेठा, रस्ते वर्दळ आदी ठिकाणची गर्दी कमी करता येईल का याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
 

1 1 _1  H x W:  
 
 
नागरिकांमध्ये जागरुकता आणणे गरजेचे
 
कोरोनाच्या आकडेवारीतून दररोजचा विस्फोट पाहता अद्यापही नागरिकांमध्ये अद्याप गांभीर्य नसल्याचे बोलले जात आहे. अद्यापही काही मंडळी विनामास्क फिरत आहेत, एकत्र येत आहेत, गर्दी होत आहे. या सगळ्यावर प्रशासन, यंत्रणेचा वचक पाहायला मिळाले नसल्याचे दिसून येत आहेत.


@@AUTHORINFO_V1@@