देशाच्या पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Apr-2021
Total Views |

Chnadra Naidu_1 &nbs
 
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला समालोचक म्हणून ओळख असलेल्या चंद्रा नायडू यांचे रविवारी निधन झाले. मनोरमागंजमधील आपल्या राहत्या घरी वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक उत्तम समालोचक म्हणूनच त्यांची ओळख होतीच, शिवाय त्या स्वतंत्र भारता देशाचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांच्या त्या कन्या होत्या. माजी खेळाडू आणि चंद्रा नायडू यांचे नातेवाईक विजय नायडू यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली.
 
 
 
१९७७ रोजी चंद्रा नायडू यांनी 'नॅशनल चॅम्पियन्स बॉम्बे' आणि 'एमसीसी' या दोन संघांमध्ये आयोजित सामन्यात समालोचन केले होते. पुरुष प्रधान समालोचन क्षेत्रात त्यांनी मोजकेच पण उल्लेखनीय काम केले आहे. भाषेवरील त्यांची पकड आणि शब्दफेक उत्तम होती. तसेच, त्यांनी इंदुरमधील शासकीय कन्या महाविद्यालयातही इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम केले होते. १९८२मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर भारत आणि इंग्लंड संघादरम्यान झालेल्या सुवर्ण जयंती कसोटी सामन्याच्यावेळी एका कार्यक्रमला चंद्रा यांनी संबोधित केले होते. चंद्रा नायडू यांनी वडील सी के नायडू यांच्या जीवनावर 'सीके नायडू : ए डॉटर रिमेम्बर्स' नावाचे पुस्तक देखील लिहिले होते. तसेच, मध्य प्रदेशच्या क्रिकेटमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.
@@AUTHORINFO_V1@@