बॉलीवूड कोरोनाच्या विळख्यात ; भूमी, विकी, अक्षयला झाला कोरोना

    दिनांक  05-Apr-2021 15:01:18
|

Bollywood_1  H
 
 
मुंबई : एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे बॉलीवूडमध्येही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. अनेक प्रमुख कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने चित्रपटांच्या चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि गोविंदा यांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर सोमवारी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी सोशल मिडियावरून दिली.
 
 
 
भूमी पेडणेकर आणि विकी कौशल हे होम क्वारटांइनमध्ये आहेत. तर, अक्षय कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अक्षयने दिली होती. यापूर्वी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक कलाकारांना कोरोना झाला होता. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक कलाकारांनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.