महाराष्ट्रात निर्बंध, पण आयपीएलचे काय? गांगुली म्हणतो...

05 Apr 2021 17:40:36

IPL 2021_1  H x
 
 
 
मुंबई : एकीकडे कोरोनाचा विळखा महारष्ट्रात सर्वाधिक असताना राज्य सरकारने मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. तर, दुसरीकडे आयपीएल २०२१ची सुरुवात अवघ्या काहीच दिवसांवर म्हणून ९ एप्रिलवर येऊन ठेपली आहे. अशामध्ये आयपीएलच्या ८ संघांमधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचेही बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे आयपीएल २०२१च्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. यावर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुलीने स्पष्टीकरण दिली आहेत.
 
मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या
 
मुंबईमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे सामने दुसऱ्या मैदानावर होण्याची चर्चा होती, यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितले की, "महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आले असले तरी तिथे सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे," असे स्पष्ट केले आहे. ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार असून मुंबईमध्ये यावर्षी आयपीएलचे १० सामने होणार आहेत. "मुंबईमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले तरी काही अडचणी येणार नाहीत. कारण, आम्ही सरकारकडून सामन्यांच्या आयोजनासाठी आधीच परवानगी घेतली आहे," असेही गांगुलीने सांगितले. चेन्नई सुपरकिंग्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या चार संघाचे सामने मुंबईमध्ये होणार आहेत.
 
बायो बबल हेच सुरक्षा कवच
 
गांगुलीने सांगितले की, "लॉकडाऊन लावणे हे फायदेशीरच आहे, कारण आजूबाजूला प्रेक्षकांची संख्या कमी असेल. काही लोकांवरच लक्ष द्यावे लागेल, जे बायो-बबलमध्ये आहेत. त्यांचे वारंवार टेस्टिंगही केले जात आहे. बायो-बबलचे नियम पाळले तर घाबरण्याचे कारण नाही. मागील वर्षी युएईमध्ये स्पर्धा सुरू होण्याआधीही अशा घटना घडल्या होत्या. एकदा स्पर्धा सुरू झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा करुया." आयपीएलशी संबंधित २२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बँगलोरच्या संघातील देवदत्त पडिक्कल, केकेआरचा नितीश राणा, दिल्लीचा अक्षर पटेल या खेळाडूंचा समावेश आहे. याशिवाय चेन्नई सुपरकिंग्सच्या कंटेंट टीमचा एक सदस्य, वानखेडे स्टेडियममधले १० कर्मचारी आणि बीसीसीआयने नियुक्त केलेल्या ८ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
 
Powered By Sangraha 9.0