कंगना म्हणाली, 'यह तो सिर्फ़ शुरुआत है…'

05 Apr 2021 19:23:14

Kangana_1  H x
 
 
 
मुंबई : महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावर आता विरोधकांकडून टीका होत असताना अभिनेत्री कंगना रानौतने देखील टीका केली आहे. तिने आपला जुना व्हिडीओ शेअर करत, 'साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करणाऱ्यांची पडझड निश्चित आहे.' असे म्हणत तिने टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
२०२०मध्ये पालघर साधू मॉब लिचींग प्रकरणानंतर कंगनाने उघडपणे महाराष्ट्र सरकारवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अगदी असेही म्हटले होते की, 'कंगनाला येथे राहण्याचा काहीही अधिकार नाही.' आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत तिने म्हंटले आहे की, "साधूंची हत्या करुन महिलेचा अपमान करणार्‍यांची पडझड निश्चित आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, पुढे बघा आणखी काय काय होते ते." अशी टीका तिने केली आहे.
 
Powered By Sangraha 9.0