धक्कादायक! मुंबईत अर्भक विकण्याचे रॅकेट उघड

    दिनांक  05-Apr-2021 13:27:00
|

mankhurd_1  H xमानखुर्द येथून चार आरोपी ताब्यात ; मुख्य आरोपी मात्र फरारमुंबई:
मुंबईतल्या मानखुर्द येथे अर्भक विकण्याचे रॅकेट सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार दोषींना जणांना अटक केली आहे. शर्मिन खान आणि तिच्या पतीने शुक्रवार दि. २ एप्रिल रोजी त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाल्याने पोलिसांकडे धाव घेतली. या तपासादरम्यान हे रॅकेट सुरु असल्याचा प्रकार उघड झाला.

शर्मिन, सिद्दीक, फरजाना आणि आशा पवार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शिवाय या प्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे. ज्युलिया फर्नांडिस नावाची एक महिला सदर प्रकरणी मुख्य आरोपी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिला अटक केलेली नाही. 

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.