ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Apr-2021
Total Views |

DD _1  H x W: 0





मुंबई : बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे रविवार, दुपारी १२ वाजता वयाच्या ८८ वर्षी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलीवुड आणि चाहत्यांवर शोककळा पसरली होती. ७० च्या दशकात अनेक सिनेमांतून शशिकला यांनी अनेक सिनेमांवर अभिनयाची छाप उमटवली होती.
 
 
 
शशिकला यांनी सुमारे शंभरहून अधिक सिनेमांत अभिनय केला. नायिका व खलनायिका म्हणून त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. शशिकला जवळकर या मुळच्या सोलापूरच्या. ओमप्रकाश सैगल यांच्याशी त्यांनी विवाह केला. शशिकला यांना बालपणापासूनच अभिनय व नृत्यामध्ये रस होता. पाचव्या वर्षापासूनच त्यांनी नृत्य शिकण्यास सुरुवात केली.
 
 
त्यांच्या वडिलांचे व्यावसायात नुकसान झाल्याने त्यांचे कुटूंब कामासाठी मुंबईत आले. त्यांची भेट लोकप्रिय गायिका-नूरजहाँ यांच्याशी झाली. नूरजहाँचे पतीच दिग्दर्शित करत असलेल्या ‘झिनत’ या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशीकला यांना संधी मिळाली. त्यानंतर व्ही. शांताराम यांच्या ‘तीन बत्ती चार रास्तामध्ये’ त्यांनी एक भूमिका साकारली होती.
 
 
आरती, गूहराह, फूल और पत्थर आदी सिनेमांमध्ये त्यांनी खलनायिका साकारली. यानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिकाच जास्त मिळू लागल्या. आरती आणि गुमरा सिनेमातील भूमिकांसाठी तर त्यांना ‘फिल्मफेअर’ पुरस्कार मिळाला. तर २००७ मध्ये सिनेसृष्टीतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.



@@AUTHORINFO_V1@@