मनसेच्या 'या' माजी आमदाराची सीएम सहाय्यता फंडाला मदत, म्हणाले.....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2021
Total Views |
MNS _1  H x W:



मुंबई -
कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारला आर्थिक मदत करण्यासाठी अनेक हात पुढे येत आहे. आता यामध्ये आणखी एक हात सामील झाला आहे. मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी माजी आमदार म्हणून राज्य सरकारकडून मिळत असलेले मानधन ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.
 
 
 
राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारसमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी अनेक हात राज्य सरकारच्या मदतीला उभे राहत आहे. असाच एक हात मनसे नेेते बाळा नांदगावकर यांनी देखील दिला आहे.


कोरोनाच्या लढाईत राज्य सरकारला आर्थिक मदत देण्यासंदर्भातील पत्र बुधवारी नांदगावकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले. त्यांनी पत्रात लिहले आहे की, "एक जबाबदार लोकप्रतिनिधी माजी आमदार व माजी गृहराज्यमंत्री तसेच समाजाप्रती असलेली बांधिलकी म्हणून मला मिळणारे माहे एप्रिल-२०२१ चे मानधन (वेतन) कोविड-१९च्या खर्चासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात यावे."
 
 
 
 
 
पुढे त्यांनी लिहले आहे की, "माझी अशीही विनंती आहे की, राज्यातील सर्व आजी-माजी आमदार व खासदारांसह महाराष्ट्रातील सर्व लोकप्रतिनिधींनी आपले मानधन जे आपणास मिळते ते सामाजिक बांधिलकी म्हणनू मुख्यमंत्री सहाय्यता निधीस द्यावे. महाराष्ट्रातील सर्वत राजकीय पक्षांनी देखील या कठीण काळात मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सहाकार्य करणे काळाजी गरज आहे."

@@AUTHORINFO_V1@@