महाराष्ट्राकडे ५ लाखांहून अधिक लसीच्या मात्रा शिल्लक

28 Apr 2021 16:33:34
vmh_1  H x W: 0


लवकरच ५ लाख मात्रांची खेप पोहोचणार
 
 
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात पुन्हा एकदा लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात २८ एप्रिल रोजीपर्यंत ५ लाख ६ हजार ३१९ लशींच्या मात्रा शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे ५ लाख मात्रांची खेप लवकरच राज्यात दाखल होणार आहे.
 
 
 
 
महाराष्ट्रामध्ये करोना लसींच्या मात्रांचा तुटवडा निर्माण झाल्याचे आणि त्यामुळे राज्यातील लसीकरण मोहिम ठप्प झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीमध्ये राज्यास २८ एप्रिल, २०२१ रोजी सकाळी आठ वाजेपपर्यंत एकुण १ कोटी ५८ लाख ६२ हजार ४७० मात्रा प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ०.२२ टक्के वाया गेलेल्या मात्रांसह एकुण १ कोटी ५३ लाख ५६ हजार १५१ मात्रांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्याकडे पात्र वयोगटातील लोकांना देण्यासाछी ५ लाख ६ हजार ३१९ मात्रा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे येत्या तीन दिवसात केंद्राकडून राज्यास ५ लाख मात्रा पुरविण्यात येणार आहेत, असे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
 
vavvinemh_1  H  
 
 
 
दरम्यान, केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत सुमारे १६ कोटी (१५,९५,९६,१४०) मात्रा मोफत पुरविल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून एकूण १४,८९,७६,२४८ मात्रा वापरण्यात आल्या. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अद्यापही १ कोटीपेक्षा जास्त (१,०६,१९,८९२) मात्रा वापरण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय येत्या ३ दिवसात राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना ५७ लाखांपेक्षा जास्त मात्रा मिळणार आहेत.
Powered By Sangraha 9.0