राज्यात मोफत कोरोना लस मिळणार : राजेश टोपे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Apr-2021
Total Views |

Rajesh Tope _1  


मुंबई : १ मे पासून राज्यात मोफत लस मिळणार की नाही याबद्दलच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. मात्र, १ मेपासून लसीकरण सुरू करता येणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
 
 
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी काही मंत्र्यांमध्ये मदभेत असल्याचे दिसून येत होते. मात्र, अखेर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यावर यामुळे साडे सहा हजार कोटींचा निधी लसीकरणासाठी राखीव ठेवावा लागणार आहे.
 
 
लस घेण्यासाठी को-वीन अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख कुटूंबांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची घोषणा केली. लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करीत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल.
 
 
त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. १२ कोटी कोरोना लसी घेण्याचा निर्णय सरकारने यात घेतला आहे. टप्प्यामध्ये या कोरोना लसी विकत घेतल्या जाणार आहेत. पुढील सहा महिन्यांत कोरोना लसीचा कार्यक्रम पूर्ण केला जाणार आहे. प्रति माह २ कोटी लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. तितकी महाराष्ट्राची क्षमता असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.
 
 
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, "गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून आपण कोविडची लढाई लढतो आहोत. जानेवारीपासून केंद्राच्या सहकार्याने राज्यात लसीकरण सुरु आहे. आजतागायत ४५ च्या पुढील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देशात विक्रम आहे. लस पुरवठ्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले.
  
उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. सध्या राज्यसमोर आर्थिक चणचण असूनही नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
 
 
 
खासगी रुग्णालयांनाही मिळणार साठा
 
लसीकरणासाठी कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्या आणि राखीव वेळ ठेवणाऱ्या रुग्णालयांनाही कोरोना लस मिळू शकणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
 
 
जास्तीत जास्त लस मिळविण्याचे प्रयत्न
 
सध्या सिरम आणि भारत बायोटेक या कंपन्यांच्या लसी उपब्ध असून, त्यांच्याशी सातत्याने चर्चा करून, पाठपुराव्याने जास्तील जास्त लस उपलब्ध करून देण्यात येईल.
 
 
उत्तम नियोजन करावे
 
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण कार्यक्रमाचे नियोजन करताना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सूचना केली आहे
 
 
कोविन अॅपवर नोंदणी करा
 
या वयोगटातील नागरिकांनी कोविन मोबाईल एपवर नोंदणी करावी, कुठेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. लसीकरणाबाबत व्यवस्थित व सुस्पष्ट सूचना मिळतील असेही मुख्यमंत्री म्हणतात. 


@@AUTHORINFO_V1@@