राज्यातील रुग्णालयात दररोज एक दुर्घटना घटत असताना आरोग्यमंत्री पदावर कसे ?
डोंबिवली : कोरोना रुग्णांना रेमडेसीवीर इंजेक्शन आणि चांगल्या सुविधा पुरविणे ही राज्य सरकाराची जबाबदारी आहे. राज्यातील रुग्णालयात दररोज एका ठिकाणी दुदैवी घटना घडत आहे. त्यात रुग्णांना आपले प्राण गमावावे लागत आहे. ठाण्यात आज एका रुग्णालयात ऑक्सीजन संपल्यामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील राजेश टोपे यांना घरी का पाठविले जात नाही. या मंत्र्याची हकालपट्टी का केली जात नाही. या आरोग्यमंत्र्याची ताबडतोब हकालपट्टी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
डोंबिवलीतील महापालिकेच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलातील कोविड रुग्णालयाला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज अचानक भेट देत त्यांची पाहणी केली. याठिकाणी असणारी ऑक्सिजन व्यवस्था, रेमडेसीवीर इंजेक्शनाचा साठा, बेडची व्यवस्था आदींची सोमय्या यांनी पाहणी करीत माहिती घेतली. डोंबिवलीतील महापालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आला असल्याने कोविड रुग्णालयांना ही अचानक भेट दिल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
कोविड रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठय़ाबाबत सोमय्या यांनी समाधान व्यक्त केले. लिक्वीड ऑक्सिजन टॅक आहे तिथे परिस्थिती ठीक आहे. पण इतर ठिकाणीची परिस्थिती खराब असल्याचे ही त्यांनी येथे नमूद के ले. नागरिकांनी रुग्णवाहिका मिळत नाही. रुग्णवाहिकासाठी अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात. तसेच रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था नाही अशी गा:हाणी ही मांडली.
सोमय्या म्हणाले, ठाण्यातील वेदांत रुग्णालयात ऑक्सिजन संपल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. उध्दव ठाकरे यांनी दररोजची रु ग्णालये ठरविली आहेत का? रुग्णालयातून ऑक्सिजन संपल्याने आणि आगी लागल्यामुळे पाच-पन्नास लोकांचा दररोज मृत्यू होत आहे. डोंबिवलीतील क्रीडासंकुलातील कोविड रुग्णालयात 750 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांना केवळ 50 रेमडेसीवीर मिळत आहे. ही परिस्थिती अत्यंत भयानक आहे.
चार दिवसांपासून चारशेची मागणी असताना तेवढय़ा प्रमाणात पुरवठा होत नाही. रेमडेसीवीर न मिळाल्याने रुग्णांची परिस्थिती खालवत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने त्यांची ऑक्सिजन आणि रेमडेसीवीरची असलेली मागणी घोषित करावी. रेमडेसीवीर अभावी रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार उध्दव ठाकरे सरकार करीत असल्याची टीका ही त्यांनी केली. कल्याण डोंबिवलीत कोविडमुळे जेवढे मृत्यू होत आहे त्यातील वीस टक्के मृत्यू देखील दाखविले जात नसल्याचा खळबळजनक आरोप ही सोमय्या यांनी केला आहे.