कोरोनाप्रादुर्भाव पाहता पर्यटकांच्या प्रवेशावर मालदीवमध्ये बंदी

    दिनांक  26-Apr-2021 15:31:24
|

maldives_1  H x
 
 

मुंबई : देशामध्ये कोरोनाची परिस्थिती असताना अनेक अभिनेते अभिनेत्री सुट्टीसाठी मालदीव, आणि अन्य काही देशांमध्ये जात असल्याच्या अनेक बातम्या आल्या. यावर अनेकांनी टीका केली. मात्र आता मालदीवमध्ये पर्यटकांना येण्यास बंदी घातली आहे. पर्यटकांना तेथील कोणत्याही हॉटेल, रिसोर्ट किंवा गेस्ट हाउसमध्ये राहता येणार नाही. मालदीवमध्ये कोरोनाचे वाढते थैमान पाहता हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
मालदीवने भारतातून सुट्टी साजरी करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील तारेतारकांना आता मालदीवला जाता येणार नाही. सध्या तिथे असलेले तारेतारका आता मायदेश परतत आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट, टायगर श्रॉफ, दिशा पटानी, जान्हवी कपूर हे कलाकार मालदीववरून परतत असताना विमानतळावर दिसले होते.
 
 
 
मुंबईत कोरोनाच्या निर्बंधांमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीज कामातून ब्रेक घेऊन मालदीवला गेले होते. या नावांमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, दिशा पटानी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, सारा अली खान यांचा समावेश आहे. याशिवाय टेलिव्हिजन विश्वातीलही अनेक कलाकार मालदीवला गेले आहेत. या कलाकारांमध्ये शेफाली जरीवाला, टीना दत्ता, गोविंदाची भाची आरती सिंह यांचा समावेश आहे. तसेच श्रद्धा कपूरची बहीण प्रियांका शर्मा देखील काही दिवसांपूर्वी मालदीव इथे विवाहबंधनात अडकली होती.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.