'या' परदेशी खेळाडूचा भारतातील कोरोनाबाधीतांसाठी पुढाकार

    दिनांक  26-Apr-2021 18:03:54
|

Pat Cummins_1  
 
 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यात आयपीएल आयोजनावर टीका. अशामध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. तर, दुसरीकडे काही परदेशी खेळाडू स्पर्धा सोडून मायदेशी परतत असताना एका खेळाडूने सगळ्यांसमोर एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सचा जलदगती गोलंदाज आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्स याने मात्र भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला. ट्विटद्वारे माहिती देताना त्याने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला ५० हजार डॉलरची (भारतीय चलनानुसार अंदाजे २९ लाख) मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
 
 
 
 
 
 
"भारतामध्ये मी गेली अनेक वर्ष येत आहे. इथल्या लोकांनी मला खूप प्रेम दिले. या कोरोनाच्या काळात अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचे मलाही दुःख होत आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असताना आयपीएल खेळवणे योग्य आहे का? असे प्रश्न अनेकजण उपस्थित करत आहेत, पण लॉकडाऊनमध्ये असलेल्या असंख्य नागरिकांना या कठीण काळात थोडा तरी विरंगुळा मिळेल, असे मला सांगण्यात आले." असे त्याने ट्विट केलेय पत्रात म्ह्नातले आहे.
 
 
आयपीएलमुळे आम्हाला कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचता येते, याचाच विचार करून मी पीएम केयर फंडला आर्थिक मदत करायचे ठरवले. यामुळे भारताला गरज असलेले ऑक्सिजन सिलेंडर विकत घेता येतील. याचसोबत मी माझे सहकारी खेळाडू आणि इतरांनाही विनंती करतो की ज्यांना भारताकडून प्रेम मिळाले आहे, त्यांनीही मदत करावी. मी ५० हजार डॉलरची मदत करत आहे." असे कमिन्सने इतर खेळाडूंनाही आवाहन केले आहे. पॅट कमिन्स हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. आयपीएल इतिहासातला कमिन्स हा तिसरा सगळ्यात महागडा परदेशी खेळाडू आहे. २०२०च्या आयपीएल लिलावात पॅट कमिन्सला केकेआरने १५.५० कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याने
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.