"आयपीएलचा पैसा बीसीसीआयनं लसीकरणासाठी वापरावा"

26 Apr 2021 16:54:47

Abhinav Bindra_1 &nb
 
 
 
मुंबई : एका इंग्रजी वृत्तपत्रात भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने क्रिकेटपटू आणि बीसीसीआयला चांगलेच खडसावले होते. "क्रिकेटपटूंना थोडेतरी समाजभान राखायला हवे. त्यांनी महामारीपासून वाचण्यासाठी लोकांपर्यंत संदेश पोहचवला पाहिजे. तसेच, बीसीसीआयनमे स्वताहून यात पुढाकार घेऊन प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे." असे म्हणून त्याने क्रिकेटपटू आणि बीसीसीआयवर टीका केली.
 
 
"देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आला आहे. ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा जाणवत असून कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. एकीकडे देशात अशी परिस्थिती दुसरीकडे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा खेळवली जात आहे. त्यामुळे या स्पर्धेवर अनेकांनी टीका केली आहे. भारतात आयपीएल खेळवण्याची ही वेळ नव्हे, असे अनेकांना वाटते. क्रिकेटपटूंना सध्याच्या परिस्थितीतही आयपीएल खेळायला मिळणे हे त्यांचे भाग्य आहे." असे मत भारताचा माजी नेमबाज अभिनव बिंद्राने व्यक्त केले.
 
 
"स्टेडियममध्ये आयपीएलचे सामने सुरु असताना स्टेडियमच्या बाहेर अ‍ॅम्ब्युलन्स रुग्णांना घेऊन रुग्णालयात जात आहेत. आयपीएलचे सामने टीव्हीवर कशाप्रकारे दाखवले जात आहेत, हे मला ठाऊक नाही. मात्र, खेळाडूंमात्र, खेळाडूंनी जरा कमी जल्लोष केला पाहिजे. त्यांनी परिस्थितीचे भान ठेवून समाजाचा आदर केला पाहिजे. त्यांनी या स्पर्धेतून योग्य संदेश दिला पाहिजे. मास्क लावणे कसे महत्वाचे आहे, सोशल डिस्टंसिंगचे पालन का केले पाहिजे हे खेळाडूंनी लोकांना सांगितले पाहिजे." असेही पुढे बिंद्राने सांगितले आहे.
 
 
तसेच, "आयपीएलमधून मिळणारा पैसा बीसीसीआयने लसीकरणासाठी वापरावा," असे आवाहनही बिंद्राने केले आहे. "आयपीएल स्पर्धा म्हणजे चॅरिटी नाही हे मला ठाऊक आहे. मात्र, मी जर बीसीसीआयच्या जागी असतो, तर आयपीएलमधून मिळालेला पैसा लसीकरण किंवा इतर मदत कार्यांसाठी दिला असता. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे आहे," असे बिंद्राने सांगितले आहे.
 
Powered By Sangraha 9.0