ऑस्कर २०२१ सोहळ्यात इरफान, भानू अथैय्या यांना वाहिली श्रद्धांजली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Apr-2021
Total Views |

Oscar_1  H x W:
 
 
नवी दिल्ली : ९३वा अकादमी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या मेमोरियम सेगमेंटमध्ये जगभरातील अनेक दिग्गज कलाकारांचे स्मरण करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता इरफान खान आणि ऑस्कर विजेत्या कॉश्च्युम डिझायनर भानु अथैय्या यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. इरफान आणि भानू यांच्या व्यतिरिक्त सीन कॉनेरी, ख्रिस्तोफर प्लमर आणि चॅडविक बॉसमन या कलाकारांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. गेल्या वर्षी जगाला निरोप देणारे सर्वोत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञ यांच्यासह जगभरातील कलाकारांचे पुरस्कार सोहळ्याच्या मेमोरियम सेगमेंटमध्ये व्हिडिओ क्लिपद्वारे स्मरण केले गेले. तसेच, शशिकला यांनादेखील आदराजंली वाहिली.
 
 
 
 
 
 
ऋषी कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांचेही केले गेले स्मरण
 
 
इरफान खान आणि भानु अथैय्या यांच्यासह अभिनेते ऋषी कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांनाही अकादमीकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र अकादमीने मेमोरियम व्हिडिओ क्लिपमध्ये या दोन कलाकारांचा समावेश केला नव्हता. अकादमीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मेमोरियम गॅलरीमध्ये त्यांच्या छायाचित्रांचा समावेश करून त्यांना आदरांजली वाहिली. गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी ऋषी कपूर आणि १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूत यांचे निधन झाले होते.
 
 
 
 
  
 
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झाले होते इरफान यांचे निधन
 
 
इरफान खान बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक होते. गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी त्यांचे निधन झाले होते. त्यांनी 'लाइफ ऑफ पाय', 'जुरासिक वर्ल्ड' आणि 'इन्फर्नो' यांसारख्या हॉलिवूड चित्रपटांत काम केले होते. भानु अथैय्या यांना १९८२ मध्ये 'गांधी' चित्रपटासाठी सर्वोत्तम कपडेपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर रोजी भानु यांचे निधन झाले होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@