नाशिक (वृत्तसंस्था): कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी द्रवरूप ऑक्सिजन घेऊन आलेले चार टँकर आज सकाळी नाशिक रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले.
विशाखापट्टणम पोलाद प्रकल्पातून निघालेल्या रो-रो एक्स्प्रेस गाडीने द्रवरूप ऑक्सिजनने भरलेले 3 टँकर काल नागपूर येथे पोहोचविले.