शर्मिला, नाना पाटेकर यांच्यासह संजय राऊत यांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Apr-2021
Total Views |

Mangeshkar_1  H
 
 
 
मुंबई : दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे वर्ष २०२०च्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीत हा पुरस्कार सोहळा कलाकारांच्या उपस्थितीत होणार नसून त्यांना ते पुरस्कार घरपोच पोहोचवले जातील, असे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले आहे. यावेळी शर्मिला टागोर, प्रेम चोप्रा, नाना पाटेकर तसेच प्यारेलाल शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
 
 
गेली ७९ वर्षे मंगेशकर कुटुंबीय मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी साजरी करतात. जे गायक, संगीतकार, नाटककार, चित्रपट कलाकार आणि अन्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देतात ते महाराष्ट्र व भारतवासीयांना प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगेशकर कुटुंब या सर्वांचा सन्मान करण्यासाठी मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान पुरस्कारांचे आयोजन करते.
 
 
खालील प्रमाणे पुरस्कारांची घोषणा
 
 
> वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना पुरस्कार देण्यात येणार आहे
 
 
> अभिनय क्षेत्रामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
 
> वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
 
 
> ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांनादेखील या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@