'श्री रामजन्मभूमी ट्रस्ट'तर्फे होणार ऑक्सिजन प्लान्टची उभारणी

    दिनांक  22-Apr-2021 19:05:52
|

ram  _1  H x W:


अयोध्या : कोरोना महामारीशी लढण्यासाठी आता रुग्णांना ऑक्सिजनची तातडीने गरज आहे. देशात सुरू असलेल्या ऑक्सिजन टंचाईबद्दल आता 'श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'तर्फे आता ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली जाणार आहे.
 
 
 
कोरोना काळात अनेक हिंदू संस्थांनी स्वतःहून पुढाकार घेत देशाला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. देशात ऑक्सिजनचा वाढत चाललेला तुटवडा पाहता श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यासतर्फे ऑक्सिजन प्लांट उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येतील दशरथ वैद्यकीय महाविद्यालयात हे प्लान्ट उभारले जाणार आहेत. त्याचा संपूर्ण खर्च न्यासातर्फे उचलला जाणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.