मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण

20 Apr 2021 18:07:27

amit thackeray_1 &nb




मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.



तिथेच त्यांच्यावर पुढील १४ दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिला आहे. अमित ठाकरे यांना कोरोनाची लक्षणं जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांची चाचणी सकारात्मक आल्यानंतर त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.




Powered By Sangraha 9.0