गुजरातमध्येही 'लव्ह जिहाद' विरोधी कायदा

02 Apr 2021 13:43:35

love jihad in gujrat_1&nb



सक्तीने केले जाणारे धर्मांतर थांबवण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर

गांधीनगरः गुजरात विधानसभेने 'धर्म स्वातंत्र्य' अधिनियम २००३ मध्ये बदल करणारे विधेयक मंजूर केले आहे. गुजरातमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी 'लव्ह जिहाद' या जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या मुद्द्यावर निर्णायक विधेयक मंजूर करण्यात आले.
सत्ताधारी भाजपच्या समर्थनामुळे या घटनेत धार्मिक जीवनशैली, दैवी आशीर्वाद आणि लग्नाच्या बहाण्यावर तोतयागिरीने केले जाणारे धार्मिक रूपांतरण प्रतिबंधित करण्याच्या आणि शिक्षा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विधानसभेत हे विधेयक विधिमंडळ कार्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी मांडले. "धर्मांतर करण्याच्या उद्देशाने महिलांना लग्नाच्या भूलथापा देत आपला धर्म बदलण्यास प्रवृत्त करण्याचा एकप्रकारे ट्रेंड सध्या सुरू असल्याचे राज्य सरकारला वाटते," व ते रोखण्यासाठी भाजप सरकारने ही दुरुस्ती आणल्याचे म्हटले आहे.

सदर विधेयकातील तरतुदीनुसार, जो कोणी लग्नाच्या भूलथापा देत असे धार्मिक रूपांतर करत असल्यास, एखाद्या व्यक्तीचे लग्न करून देत असल्यास किंवा लग्न करण्यास मदत करून देत असल्याचे आढळल्यास, त्याला तीन ते पाच वर्षांची कारावासाची शिक्षा होऊ शकते व दोन लाख रुपये दंडदेखील भरावा लागू शकतो. त्याचप्रमाणे विवाह एखाद्या अल्पवयीन, स्त्रीचा किंवा एससी किंवा एसटी समाजातील एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असे घडत असेल, तर त्याला चार ते सात वर्षांची शिक्षा व तीन लाख रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0