'हा' देश झाला कोरोनामुक्त; मास्क घालण्याचे बंधनही नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Apr-2021
Total Views |
corona _1  H x



इस्त्रायल -
एकीकडे संपूर्ण जग कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी लढत असताना, इस्त्रायल या देशाने स्वत: कोरोनापासून मुक्त झाल्याचे जाहीर केले आहे. कोरोनामुक्त होणारा इस्त्रायल हा जगातील पहिलाच देश आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवून या देशाच्या प्रशासनाने आता लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल करुन जनजीवन पुन्हा सुरू केले आहे.
 
इस्त्रायलमधील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा उघडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पुन्हा शाळेत जाण्यास सुरुवात केली आहे. इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे बंधनही दूर केले आहे. केवळ मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मास्क घालणे आवश्यक असणार आहे.
 
 
इस्त्रायलने जगभरातील लसीकरण मोहिमेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि देशात वेगाने लसीकरण केले. इस्त्रायलने डिसेंबरमध्ये लसीकरण मोहीम सुरू केल्यापासून गंभीर प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले. त्यामुळेच तेथे अनेक कोरोना निर्बंध हटविले गेले आहेत. इस्रायलने गेल्या आठवड्यात जाहीर केले आहे की, मे महिन्यापासून परदेशी पर्यटकांना देशात प्रवेश देण्यात येईल आणि त्यांना लसीही दिली जाईल. तथापि, इस्त्रायल नियंत्रित वेस्ट बँक आणि गाझामधील लसीकरण कमी प्रमाणात होत आहे, ज्याबद्दल सरकारवर टीका केली जात आहे.
 
 
 
गेल्यावर्षी कोरोना संक्रमणाच्या प्रारंभापासून इस्त्रायलमध्ये कोरोना संक्रमित ८,३६,००० प्रकरणे आढळून आली आहेत. या साथीमुळे ६,३३१ लोकांचा मृत्यू झाला होता. तर इस्त्राईलमधील ९.३ दशलक्ष नागरिकांपैकी ५३ टक्के लोकांना फिझर / बायोएन्टेक लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. जेव्हा डिसेंबरमध्ये इस्रायलने लसीकरण मोहीम सुरू केली तेव्हापासून मृतांच्या संख्येत तीव्र घट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना देण्याासाठी त्यांनी लाॅकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@