कुंभ, कोरोना, पुरोगामी आणि आमचा अनुभव

17 Apr 2021 11:40:02


kumbh_1  H x W:


पिठाधीश्वर, महामंडलेश्वर, महंत ह्यांचे रथ त्याच्या पुढे नागा साधू आणि भक्तगण अतिशय शिस्त बद्ध मिरवणूक होती. ठरलेल्या वेळी ही मिरवणूक घाटावर पोचली. प्रत्येक आखाड्याला स्नानाची मर्यादित वेळे आखून दिली होती त्या वेळेतच जुना आखाड्याचे स्नान झाले आणि सर्व साधूंनी घाट रिकामा केला. पोलिसांनी ही कोणीही नागरिक घाटावर राहणार नाही यासाठी अतिशय चांगली रचना लावली होती. काही मिनिटात त्यांनी तो घाट मोकळा केला. पुढील आखाड्याचे साधू येण्यापूर्वी सर्व घाट पाण्याने धुतला वायपरनी घाट कोरडा केला, सॅनिटाईजही केला अन्य परिसर आणि रस्ता ही लगेचच झाडून स्वछ केला गेला अतिशय वेगाने फक्त १०-१५ मिनिटात सर्व कामे होत होती. प्रशासन इतक्या शिस्त बद्ध आणि जलद गतीने काम करताना बघून खूपच आश्चर्य वाटले.

मी आजच हरिद्वार येथून परत आलो आहे. मी हरिद्वारला १२ एप्रिल ला गेलो उत्तराखंड येथे प्रवेश करताना आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य होती. तसेच कुंभसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन आरटी-पीसीआर चाचणी अहवालाशिवाय डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट ही अनिवार्य होते. डेहराडून यथील विमानतळावर आमचा नेगेटिव्ह रिपोर्ट बघूनच आम्हाला विमानतळाबाहेर पडण्यास परवानगी दिली. कॅबने हरिद्वारकडे निघाल्यावर वाटेत नेपाली फार्म ह्या चौकापर्यंतच आमची गाडी जाऊ शकली. तेथून पुढे हरिद्वारकडे सर्व खाजगी वाहनांना प्रवेश बंदी होती. तिथे परत आमची सर्व कागदपत्र बघितली गेली आणि आम्ही सरकारी बसने हरिद्वार येथील मोतीचूर बस स्टॅन्डपर्यंत गेलो. आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करताना ही आम्हाला आमचा आरटी-पीसीआर चाचणी रिपोर्ट दाखवायला लागला. अनेक ठिकाणी आरटी-पीसीआर चाचणी रिपोर्ट चेक करत होते. १२ एप्रिल ते १५ एप्रिल सकाळपर्यंत हरिद्वारमध्ये सर्व खाजगी वाहतूक बंद होती.



१४ तारीख बैसाखीच्या मुहूर्तावर आम्ही जुना आखाडाच्या साधू संतांबरोबर त्यांच्या शोभा यात्रेबरोबर शाही स्नानाला हरकी पौडी ह्या प्रसिद्ध घाटावर गेलो. पिठाधीश्वर, महामंडलेश्वर, महंत ह्यांचे रथ त्याच्या पुढे नागा साधू आणि भक्तगण अतिशय शिस्त बद्ध मिरवणूक होती. ठरलेल्या वेळी ही मिरवणूक घाटावर पोचली. प्रत्येक आखाड्याला स्नानाची मर्यादित वेळे आखून दिली होती त्या वेळेतच जुना आखाड्याचे स्नान झाले आणि सर्व साधूंनी घाट रिकामा केला.


kumbh_1  H x W:


पोलिसांनी ही कोणीही नागरिक घाटावर राहणार नाही यासाठी अतिशय चांगली रचना लावली होती. काही मिनिटात त्यांनी तो घाट मोकळा केला. पुढील आखाड्याचे साधू येण्यापूर्वी सर्व घाट पाण्याने धुतला वायपरनी घाट कोरडा केला, सॅनिटाईजही केला अन्य परिसर आणि रस्ता ही लगेचच झाडून स्वछ केला गेला अतिशय वेगाने फक्त १०-१५ मिनिटात सर्व कामे होत होती. प्रशासन इतक्या शिस्त बद्ध आणि जलद गतीने काम करताना बघून खूपच आश्चर्य वाटले. आम्ही स्नान करून बाजाराच्या दिशेने निघालो. बाजारपेठेत जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सुरवातीलाच सर्व नागरिकांच्या प्रत्येक बॅग, पिशवी ही सॅनिटाईज केली जात होती. प्रत्येकाचे हात ही सॅनिटाईज केले जात होते. आपण फोटो मध्ये बघू शकता. मास्कबद्दल खूप जागृती असल्याचे लक्षात येत होते फक्त पोलीसच नाही तर प्रत्येक जण कोणाचा मास्क नसल्यास त्याला मास्क लावण्यासाठी प्रेमाने सूचना करत होता. पोलीस ही अरेरावी करत नव्हते हे विशेष.( आम्ही फोटोपुरतेच मास्क काढत होतो)


kumbh_1  H x W:


करोना संबंधात प्रशासनाकडून खूपच काळजी घेतली जात आहे हे पदोपदी लक्षात येत होते. एका आखाड्या मधील २५-३०साधू करोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी होती. हरिद्वारला एका दिवशी ७०-८० जण पॉझिटिव्ह असल्याची बातमी वृत्तपत्रात वाचली महाराष्ट्रातील कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर ह्या शहरांशी तुलना केल्यास ही संख्या अगदीच नगण्य वाटते. ऋषिकेश मधील शाळा पण सुरु असल्याचे लक्षात आले तेथील जनजीवन करोनाची काळजी घेत पण सामान्य पणे सुरु आहे एकूणच कुंभाची व्यवस्था, स्वछता, शिस्त, वाखाणण्या सारखी आहे. स्थानिक रहिवाश्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या वर्षी ५०% च गर्दी आहे. उत्तराखंडमधील रस्ते ही अतिशय छान आहेत. आज आम्ही डेहराडून येथून मुबंई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल २ ला आलो परंतु आमचे आरटी-पीसीआर रिपोर्ट चेक करायला मुबंई विमानतळावर कुठलीही व्यवस्था नव्हती. एकही मनुष्य नव्हता. एकाही प्रवाश्याचा रिपोर्ट चेक केला नाही. मुबंईमध्ये एवढा करोना वाढत आहे परंतु विमान प्रवास करून येणाऱ्या प्रवाश्यांचा रिपोर्ट चेक करण्याची व्यवस्था नसणे म्हणजे...



- राजेश कुंटे


Powered By Sangraha 9.0