नवी दिल्ली : रुग्णालयांबाहेर प्रतिक्षेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांची अवस्था ही हृदय हेलावून टाकणारी होत आहे. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनामुळे पतीचे निधन झालेल्या महिलेला अश्रू अनावर झाल्याने तिने टाहो फोडला. तिच्या लेकरांनी तिला घट्ट मीठी मारून धीर देण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनाही स्वतःला सावरता आलं नाही.
भारतातील दैनंदिन नवीन रुग्णसंख्येत सतत भर पडत आहे. गेल्या २४ तासांत २,००,७३९ नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि राजस्थान या दहा राज्यांतील दररोजच्या बाधित रुग्णसंख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी ८०.७६ टक्के रूग्ण या १० राज्यांत आहेत. महाराष्ट्राच्या दैनंदिन बाधित रुग्णांत, सर्वाधिक ५८,९५२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्याखालोखाल उत्तरप्रदेशमधे २०,४३९ तर दिल्लीत १७,२८२, नव्या रूग्णांची नोंद झाली.
भारतातील सक्रीय रूग्णसंख्या आता १४,७१,८७७ वर पोचली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी १०.४६ टक्के रूग्ण सक्रीय आहेत. गेल्या २४ तासांत, बाधित रूग्णसंख्येत १,०६,१७३ सक्रीय रुग्णांची भर पडल्याची नोंद झाली. महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या पाच राज्यांत भारतातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ६७.१६ टक्के सक्रीय रुग्ण आहेत. देशातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ४३.५४ टक्के रूग्ण केवळ महाराष्ट्रात आहेत .
भारतातील बरे झालेल्या रूग्णांची एकूण संख्या १,२४,२९,५६४ इतकी आहे. देशाचा बरे होण्याचा राष्ट्रीय सरासरी दर ८८.३१ टक्केआहे. गेल्या २४ तासांत ९३,५२८ रुग्ण बरे झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत १,०३८ मृत्यूंची नोंद झाली. म्रुत्यु झालेल्यांपैकी ८२.२७ टक्के मृत्यु दहा राज्यांत झाले आहेत.महाराष्ट्रात सर्वाधिक (२७८) म्रुत्यूंची नोंद झाली. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये १२० मृत्यूंची नोंद झाली. नऊ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांत, गेल्या २४ तासांत कोविड-१९मुळे एकाही म्रुत्यूची नोंद झाली नाही.
गेल्या २४ तासांत लसींच्या एकूण ३३ लाख मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या ८९ व्या दिवशी ३३,१३,८४८ लसींच्या मात्रा देण्यात आल्या. त्यात ४४,८६४, सत्रांतून २८,७७,४७३, लाभार्थ्यांना पहिली मात्रा देण्यात आली तर ४,३६,३७५ लाभार्थ्यांना दुसरी मात्रा देण्यात आली.