'बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती' : पंकजा मुंडे

    दिनांक  16-Apr-2021 13:42:11
|

pankaja munde_1 &nbsबीड
: राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने राज्यभरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यातच कोरोना लसीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण कार्यक्रम ठप्प झालेत. या संपूर्ण परिस्थितीमुळे विरोधक सत्ताधारी ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आरोगयमंत्री राजेश टोपेंना पत्र लिहून अप्रत्यक्षपणे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हे पत्र ट्विट करत त्या म्हणतात, "#REMDESIVIR चा तुटवडा बीडमध्ये जाणवत आहे, आरोग्य मंत्री यांना विनंती आहे जातीने लक्ष घालून उपलब्ध करून द्यावे. राज्य सरकारला आलेल्या २ लाख पैकी बीडला ही पुरेस्या लसी मिळाल्या पाहिजे. बीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचे हित माहिती आहे जनतेच्या हितासाठी आम्ही लढण्यास तयार आहोत." पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हटलंय की, बीड जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनली आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत जिल्ह्यात ७२९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ३४ हजार ९८९ इतकी आहे त्यातील ३० हजार ४७८ जण बरे होऊन घरी परतले आहेत. एकीकडे आरोग्य यंत्रणा पूर्ण ताकदीनं रुग्णांना मदत करण्यासाठी अहोरात्र काम करत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना यामुळे फार मनस्ताप सहन करावा लागत आहे. लस देखील पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने लसीकरण केंद्र बंद पडली आहेत. एकूणच या प्रकाराने रुग्णसंख्या वाढीत भर पडत आहे असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे जातीने लक्ष घालावे आणि रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत. महाराष्ट्र राज्य सरकारला आलेल्या २ लाख लसींपैकी बीडला इतर जिल्ह्याच्या तुलनेत केवळ २० लसी मिळाल्या आहेत ही अतिशय खेदजनक बाब आहे. याकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा लसी उपलब्ध करून द्यावेत आणि तशी व्यवस्था करण्यासाठी संबधित यंत्रणेला सूचित करावे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे पत्राच्या माध्यमातून केली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.