नागपुरकरांसाठी नितीन गडकरी ‘अॅक्शन मोड’मध्ये

    दिनांक  16-Apr-2021 17:04:44
|

NG_1  H x W: 0

 
 
नागपुरसह महाराष्ट्रासाठी नितीन गडकरी युद्धपातळीवर काम करीत आहेत
 
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्रीय परिवहन मंत्री आणि नागपुरचे खासदार नितीन गडकरी नागपुरातील करोना स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळे नागपुरमधील करोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होत आहे.
 
 
 
संपूर्ण देशात पुन्हा एकदा करोना संसर्ग वाढण्यास प्रारंभ झाला आहे. नागपुरमध्येही करोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून त्यामुळे गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे ‘अॅक्शन मोड’मध्ये कार्यरत आहेत. नागपुरचे पालकमंत्री आणि राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ते सतत संपर्कात आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, रुग्णालयातील आयसीयू आणि ऑक्सिजन खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनचा पुरवठा, करोना आरटी-पीसीआर चाचण्याची संख्या वाढविणे याकडे गडकरी हे जातीने लक्ष देत आहेत.
 
 
 
नितीन गडकरींनी घेतलेले निर्णय :
 
 
• रेमडेसिवीर इंजेक्शन मिळण्यासाठी नितीन गडकरी यांनी 'सन फार्मा'चे दिलीप सिंघवी यांच्याशी पाच दिवसांपूर्वी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. त्यानंतर आजवर नागपूरात ४९०० व विदर्भात ५०० इंजेक्शन्स पोहोचले आहेत.
 
 
• 'मायलॉन लॅबरॉटरीज'चे भारतातील सीईओ राकेश बोमजाई यांच्याशीदेखील गडकरी यांनी दूरध्वनीवरून संपर्क केला होता. त्यानंतर मायलॉनकडून आजवर नागपूरसाठी ६००० रेमडेसिवीर इंजेक्शनची पूर्तता करण्यात आली आहे.
 
 
 
• अवघ्या पाच दिवसात असे एकूण ११४०० रेमडेसिवीर इंजेक्शन्स नागपूरला मिळाले आहेत.
 
 
 
• रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात पंतप्रधान व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशीदेखील गडकरी यांनी दूरध्वनीवरून पाठपूरावा केला असून रेमडेसिवीरची निर्मिती १० लक्ष वायल प्रति महिना वाढवण्यास व नवीन प्रकल्प सुरू करण्यास मंजूरी मिळवून दिली. याचा केवळ नागपूरलाच नाही, तर संपूर्ण राज्याला फायदा होणार आहे.
 
 
• नागपूरमध्ये ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी 'भिलाई स्टील प्लॉट'शी संपर्क साधून ३० टन ऑक्सिजन मिळवून दिले. हा ऑक्सिजन वितरित करण्यासाठी विशाखापट्टणम येथून टँकरचीही सुविधा उपलब्ध करून दिली.
 
 
• नागपूरसाठी पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) मिळवून देण्यासाठीदेखील गडकरी प्रयत्नशील असून लवकरच १००० पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
 
 
• नागपूरातील व्हेंटिलेटर्सची आवश्यकता लक्षात घेता विशाखापट्टणम येथील एमपीझेड द्वारा निर्मित (किंमत केवळ २ लक्ष रुपये) १००० व्हेंटिलेटर्स नागपूरकरांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यासाठीही गडकरी प्रयत्नशील आहेत.
 
 
• गडकरी यांच्या प्रयत्नांतून 'नागपूर एम्स'मध्ये केवळ दोन दिवसांत ६० वरून ५०० बेड्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
 
 
• नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर येथे तातडीने २०० बेड्सना मंजूरी मिळवून देण्यात आली आहे.
 
 
• जी रुग्णालये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अतिरिक्त बेड्स वाढवून मागत आहेत, त्यांना २४ तासांत सदर परवानगी मिळवून देण्याचे निर्देश गडकरीजी यांनी दिले आहेत.
 
 
• नागपूरात आर-टीपीसीआर टेस्ट तातडीने व्हाव्यात या साठी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी स्पाईस जेट (हेल्थ) चे मालक अजय सिंह यांच्याशी दुरध्वनी द्वारे चर्चा करून आर-टीपीसीआर टेस्ट साठी नागपूरला दोन मोबाईल चाचणी लॅब देण्याची विनंती केली . स्पाईस हेल्थ ने ही विनंती मान्य करत मोबाईल टेस्ट लॅब ताबडतोब नागपूरला पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे . या एका लॅब मधे ३५० रुपयात प्रती दिन ३००० लोकांच्या चाचण्या होतील.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.