कलाक्षेत्रातील महिला कलाकारांचा दबदबा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Apr-2021
Total Views |

Art_1  H x W: 0
 
 
 
प्रस्थापित महिला कलाकारांच्या कलाविषयक योगदानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांचा उल्लेख या प्रयोजनाद्वारे होत आहे, ती नावे म्हणजे महाराष्ट्रातील, किंबहुना भारत देशातील समस्त महिला वर्गातील कलाकारांच्यासाठी प्रतीकात्मक समजावीत. कारण, सर्वांचीच नावे व त्यांचे कलाकार्य याची नोंद घेणे सदर लेखासाठी केवळ अशक्य आहे.
 
 
 
आपल्या भारत देशात महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे की, या राज्यात ‘कलासंचालनालय’ आहे. दूरदृष्टी लाभलेले आणि कलेबद्दल आत्मियता असलेले बाळासाहेब तथा मधुकरराव चौधरी, ज्यांनी शिक्षणक्षेत्रात ‘१० + ०२ + ०३’ हा अभ्यासक्रम राबविला, जो नंतर सार्‍या राज्यांनी आणि भारताबाहेरही या सूत्राची मदत घेण्यात आली, त्या तत्कालीन शिक्षणमंत्र्यांनी, महाराष्ट्रातील कलाकारांच्या ठायी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून, दादा आडारकरांना बरोबर घेऊन, ‘कलासंचालनालया’ची स्थापना केली. या ‘कलासंचालनालया’ला दादा आडारकरांसह शांतिनाथ आखाडे, माधवराव सातवळेकर, बाबुराव सडवेलकर यांच्यासारखे कलेची जाण, कलाविषयक दृष्टिकोन, कलेबद्दल तळमळ असलेले कलासंचालक लाभले. ‘सद्यस्थितीसंदर्भात बोलण्या-लिहिण्याचं धाडस शहाण्याने करू नये,’ असं नुकत्याच दिवंगत झालेल्या एका कलाकाराचे विधान चिंतकांना बरेच काही सांगून जाते. आजच्या आपल्या लेखाचा विषय वेगळा असल्याने फक्त पार्श्वभूमीसाठी हे लिहिणं आवश्यक वाटलं.
 
 
 
पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे स्व. दिवाकर डेंगळे एकदा म्हणाले होते, “पुरुष आणि महिला यांच्या तुलनेत महिला चित्रकारांची संख्या तुलनेने अत्यल्प आहे, यावर काही प्रयोगशील उपक्रम राबविले जावेत.” एकदा अधिष्ठाता प्रा. म. भा. इंगळे सर, जे. जे. स्कूलचे अधिष्ठाता होते. तेव्हा तत्कालीन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या शुभहस्ते, राज्यकला प्रदर्शनाचे उद्घाटन, ‘जेजे’च्या कॅम्पसमध्ये झाले होते. त्यांनी अगदी सूक्ष्मपणे प्रदर्शनाचे निरीक्षण करुन, महिला कलाकार म्हणून स्वतंत्र पारितोषिक ‘राज्य पुरस्कार’ स्वरुपात सुरू करण्याची सूचना केली आणि तेव्हापासून दिल्या जाणार्‍या १५ ‘राज्य कला पुरस्कारां’मध्ये एक पुरस्कार खास महिला कलाकारांस दिला जातो. तत्कालीन अभ्यासू लेखक, कलाप्रशासक आणि जगत्विख्यात पेंटर बाबुराव सडवेलकर यांचेही कलाविषयक धोरण व्याप्तिपूर्ण होते. ते म्हणायचे, “कला हा स्वतंत्र विषयच नाही. ती एक मूलभूत शिस्त आहे की, ज्यामधून इतर विषयही योग्य तर्‍हेने शिकता येतात. ज्यांना सुंदर लयबद्ध गोष्टी पाहून आनंद होतो, त्यांची संवेदनाशक्ती सचेतन होते. चांगल्या कलात्मक गोष्टी बनविण्याची प्रवृत्ती निर्माण होऊन अशा व्यक्तींच्या घरापासून तर परिसरापर्यंत त्याचं प्रतिबिंब जाणवू लागतं. अशा व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात आपला प्रभाव पाडल्याशिवाय राहत नाहीत. त्यांच्या राहणीमानाला, जीवनमानाला एक ढंग प्राप्त होतो. जीवन रसिकेतेने जगण्याची क्षमता आल्यामुळे कठीण परिस्थितीतही त्यांच्या मनाचा तोल सहसा ढळत नाही. लहानपणापासून कलेचे संस्कार मनावर घडल्यास व्यक्तिमत्त्वाला एक गहिरेपणा प्राप्त होतो. घरातील एक मुलगी कलेच्या संस्कारात लहानाची मोठी झाली, तर पुढील काही पिढ्या या समतोल आणि संकटांना समर्थपणे तोंड देण्यास तयार होतात.”
 
 
बाबुरावांचे ‘कलासंचालक’ या पदावरील अधिकार्‍याचे विचार ऐकल्यावर कधी कधी असे वाटते की, काही अपवाद वगळता ही जुनी कलाकार मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देण्यासाठी खरंच मार्गदर्शक ठरली असती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी फार पूर्वी भारतीय संस्कारांना समृद्ध करण्यासाठी घरातील स्त्रीचं स्थान फार महत्त्वाचं आहे, हे ओळखलं होतं. म्हणूनच घरातील स्त्रीला शिक्षित करणं हे त्यांनी त्यांचं पहिलं कायर्र्स्थान ठरविलं होतं. कलाक्षेत्रात स्त्री कलाकार म्हटलं की, अमृता शेरगील यांचं नाव घेतल्याशिवाय महिला पेंटर्सवरील चर्चा व लिखाण पूर्णत्त्वास जात नाही. भारतात विशेषतः महाराष्ट्रात महिला कलाकार अत्यल्प संख्येने आहेत. तथापि, त्यांच्या त्यांच्या जागी त्यांचे कलाविषयक योगदान, त्यांचं कौटुंबिक वातावरण आणि त्यांची स्वयंपूर्णता स्पृहणीय आहे. या लेखात आपण महाराष्ट्रातील काही, परंतु प्रस्थापित महिला कलाकारांच्या कलाविषयक योगदानाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यांचा उल्लेख या प्रयोजनाद्वारे होत आहे, ती नावे म्हणजे महाराष्ट्रातील, किंबहुना भारत देशातील समस्त महिला वर्गातील कलाकारांच्यासाठी प्रतीकात्मक समजावीत. कारण, सर्वांचीच नावे व त्यांचे कलाकार्य याची नोंद घेणे सदर लेखासाठी केवळ अशक्य आहे.
 
 
‘जहांगिर कला दालना’त एकदा ज्येष्ठ चित्रकर्ती प्रफुल्लाताई डहाणुकर यांच्या कलाकृतींच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. समयोजित भाषणे, मनोगते वगैरे ऐकली. एक ध्यानात येणारी गोष्ट म्हणजे, प्रफुल्लाताईंनी अनेक नवोदित तसेच उदयोन्मुख कलाकारांना कलेचे व्यासपीठ मिळवून दिल्याचे हृद्य आठवणीत बरेच जणं बोलत होते. मागच्या सप्ताहात ‘ललित कले’चे अध्यक्ष ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांची भेट झाली होती. तेव्हा त्यांच्या देश-विदेशातील अनेक दौर्‍यांमधून त्यांना असे ध्यानात आले की, महिला कलाकारांच्या कलाकृतींमधून संवेदनक्षम भावना, अभिव्यक्त होताना दिसतात. अशा कलाकृती निर्माण करणार्‍या महिला कलाकारांना त्यांनी मागच्या महिन्यात साजरा झालेल्या जागतिक महिला दिनी, ललित कलादालनात व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलाप्रतिमेचे पवित्र दर्शन घडविले.
 
 
औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध ‘गरुड अ‍ॅड एजन्सी’मध्ये चित्रकार म्हणून ज्यांनी सुरुवात केली आणि नंतर ‘गरुड’चे नेतृत्वच ज्या गेल्या १५-१६ वर्षांपासून करीत आहेत, त्या चित्रकार माधुरी प्रशांत गौतम-टाकळीकर यांनी जाहिरात एजन्सीच्या कामांशिवाय फॅब्रिक पेंटिंग, हॅण्ड एम्ब्रॉयडरी, रांगोळी आर्ट आणि पुस्तक डिझायनिंग यामध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. घाटनांदूर, ता. अंबेजोगाई, जि. बीड येथील चित्रकर्ती भारती हजारी-ठाकूर यांनी ‘आदर्श चित्रकला शिक्षिका’ म्हणून जिल्ह्यात आदराचे स्थान निर्माण तर केलेच, तथापि नवरात्रोत्सवातील सजावटी, महिलांच्या विविध कार्यक्रमांमधली सजावट, कलापूर्ण आखणी करण्याच्या कौशल्यांचं एक व्यावसायिक दालन त्यांनी सुरू केलं. चित्रकर्ती प्रज्ञा भुरे हेही असंच एक प्रयोगशील नाव. शिकत असतानाच वर्गातील विद्यार्थ्यांसाठी खानावळीचे डबे बनवून कलाशिक्षण त्यांनी पूर्ण केले. ‘एमएफए क्रिएटिव्ह पेंटिंग’ ही पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ‘व्यावसायिक पेंटर’ म्हणून त्या स्वयंपूर्ण झाल्या. त्या म्हणतात, “मानवाला अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा आवश्यक असतात, पण माझ्यासाठी चौथी गरज ही कलेची भूक.” बकरी हा घटक घेऊन त्यांनी अनेक कलाकृती निर्माण केल्यात, ज्या कलारसिक मान्य बनल्या आहेत. उपयोजित कलाकार दीपाली हांडे-पाटील यादेखील सध्या बंगळुरू येथे वास्तव्यास असणार्‍या कलाकार आहेत. औरंंगाबाद येथे परिचित असलेल्या प्रणिता अनंत देशपांडे-हस्तक यांनी
Institute of Media, Fashion and Allied Arts <https://www.shiksha.com/college/institute-of-media-fashion-and-allied-arts-imfaa-mumbai-colaba-27649/courses>‘आयएफएमएए’ ही संस्था सुरू केली. दोघेही म्हणजे पती-पत्नी ‘आर्टिस्ट’ असल्यामुळे त्यांच्या या संस्थेने नुकतेच पाव शतक पूर्ण केले आहे. त्यांच्या सदर संस्थेत विविध हस्तकला तंत्रांची ओळख आणि ती विकसित करण्याचं ज्ञान दिलं जातं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, दरवर्षी १५० महिलांना हस्तकला-कारागिरीचं शिक्षण देऊन त्यांनी शेकडो-हजारो महिलांना स्वयंपूर्ण केले आहे. भरतकाम, काचकाम, शटलपिन, कवडी, रिबन, बटण यांपासून कलाकृती बनविण्याचं काम‘आयएफएमएए’द्वारे चालते.
 
 
ग्राफीक आर्टिस्ट नीता राम चौधरी-मालखरे याही एक प्रथितयश आर्टिस्ट. ‘मखिजा’, ‘अ‍ॅडफॅक्टर्स,’ ‘अड्राईट’ अशा नामांकित जाहिरात संस्थेत नीता चौधरी यांनी जबाबदारींच्या पदांवर काम केले. ‘अ‍ॅरीस्टोक्रॅट लगेज’, ‘बॅक्कारोज मेन्स टॉयलेटरिज’, ‘हाफकिन्स’ यांची जाहिरात संकल्पना त्यांनी बनवलेली आहे. ‘रेक्सरॉथ-जर्मन’ यांची प्रदर्शनाची कामे चौधरी यांनी प्रभावीपणे केली आहेत. ‘टाटा प्रेस’ची बरीच माध्यम जाहिरातीची कामे त्यांनी केली आहेत. पुण्यात सुप्रसिद्ध असलेल्या, ‘इव्हेंट फोटोग्राफी’च्या प्रियदर्शनी पाटील यांनी नवजात बालकापासून तर सहस्रचंददर्शन सोहळ्याच्या 80व्या वर्षांच्या व्यक्तींची ‘पोटेर्र्ट-फोटोग्राफी’सह विविध प्रयोग करुन वेगळी ओळख निर्माण केली आहे.
 
 
मुंबईतील पूर्वीच्या ‘रहेजा स्कूल ऑफ आर्ट’च्या प्राचार्या राधिका अंबेकर तसेच वसई-विरार परिसरातील ‘विवा आर्ट कॉलेज’च्या प्राचार्या संगीता पाटील किंवा ‘भारतीय कला महाविद्यालया’च्या प्राचार्या अनुपमा पाटील, मुंबईच्या कला महाविद्यालयाच्या प्रयोगशील प्राध्यापिका वर्तक, उल्लेख करण्यास आनंद वाटेल अशा महिला कलाकारांचे कला शिक्षणातील योगदान स्मृतिप्रवण आहे. अमरावतीच्या महिला पेंटर निशिगंधा गरतकर यांनी पेंटिंगमध्ये केलेले ‘{क्रएटिव्ह’ काम रसिकमान्य आहे. त्यांच्या कलासाधनेवर अजिंठा-वेरुळ येथील कलाकृतींचा प्रभाव आहे. त्यांनी ‘{वपश्यने’तील अमूर्त अनुभव मूर्त स्वरुपात व्यक्त करण्यासाठी अजिंठा-वेरुळ येथील कलाकृतींचा आधार घेतलेला आहे. {वविध शैली आणि तंत्रात त्याचं काम ‘सिद्धहस्त’ म्हणून मान्यता पावलेलं आहे.
 
 
कलेचा, उपयोजित कलाप्रकारात कसा उपयोग करता येईल, यावर सतत प्रयोगशील उपक्रम राबविणार्‍या सुषमा कुळकर्णी यांनी सोलापूरच्या टॉवेल्ससाठी {डझाईन्स बनवून एक वेगळी ओळख निर्माण केली. व्यावसायिक कलाकार म्हणून त्यांचं कलायोगदान प्रदीर्घ आहे. ‘टेक्सटाईल’ क्षेत्रात महिला कलाकार शामा तळणीकर-इनामदार यांनी कलापदार्पणातच ‘राज्य पुरस्कार’ मिळविला होता. ‘बालभारती पुणे’ येथील हस्तपुस्तिकांसाठीची त्यांची रेखांकने प्रसिद्ध आहेत. हिंगोलीच्या चित्रकर्ती शुभांगी बसोले, वर्षा जाधव-साळुंखे ज्यांनी ‘वारली शैली’ वर काम केले आहे, चित्रकर्ती आरती शहा, आर्टिस्ट स्वाती जपे-ढोबळे, दिल्लीच्या सुमित्रा अहलवात, बंगळुरूच्या संगीता कोडलकर-राजनकर अशी काही नावे महाराष्ट्रीय महिला कलाकार म्हणून कलाजगतात पाय रोवून आहेत.
 
 
 
{चत्रकर्ती राजश्री कुळकर्णी-वाडेकर यांची ‘साहस इन्फोव्हिजन अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सी’ आहे. कोकणात महाड ते औरंगाबाद आणि बराच कलाप्रवास त्यांनी केलेला आहे. त्यांना अनेक सन्मान-पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ‘कॉर्पोेरेट’मध्ये त्यांनी त्यांचं स्थान ‘माईलस्टोन’ने प्रमाणे ठेवलेलं आहे. चित्रकर्ती संगीता बसमतकर-मांडे यांनीदेखील फार वेगळ्या स्तरावर जाऊन काम केले आहे. ‘रंगसंगत’ नावाचे ‘वेंचर’ सुरू करुन त्यात त्या Wall decor Items, Trays, Lamp shades, Wall, Plates Bags असे हॅण्ड पेंटेड प्रकार ठेवून ऑनलाईन ऑर्डर्स घेतात. स्विस सरकार आणि भारत सरकार यांच्या वेगवेगळ्या मिनिस्ट्री व टेरीसाठी काम करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. अशाच आणखी चित्रकर्ती संयोगिता हाडे, ममता टांक-राठोड, माणिक भदे-त्रिफळे यांची कामे नोंद घेण्यासारखी आहेत. किशोरी अभ्यंकर-भालेराव, हैदराबादच्या दया कोदरकर-अष्टपुत्रे यांची नांवे कलाविश्वाला सुपरिचित आहेत.
 
 
राज्याच्या कलासंचालनायांतर्गत, औरंगाबादच्या शासकीय अभिकल्प कला महाविद्यालय (शाकम), मुंबर्ईच्या ‘सर जे. जे. स्कूल समूह’, नागपूरच्या शासकीय चित्रकला व अभिकल्प महाविद्यालयासह इतरही कला महाविद्यालयांतून कलाशिक्षण घेऊन कला क्षेत्रात महिलांनी दबदबा निर्माण केला आहे. महिला कलाकारांच्या कला योगदानासाठी आणखीही काही आवश्यक ठोस उपक्रमांची आवश्यकता आहे. या लेखाद्वारे आपल्या ध्यानी येईल की, महाराष्ट्रातील महिला चित्रकर्तींचा देशभर संचार आहे. त्यांच्या कलाकार्यास सलाम...
 
 
- प्रा. गजानन शेपाळ
 
 
@@AUTHORINFO_V1@@