गेल्या 24 तासांत देशभरात दिले गेले 33 लाख लसींचे डोस

15 Apr 2021 20:58:30



TIka_1  H x W:



भारतातील एकूण लसीकरण 11.44 कोटींहून अधिक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशभरात कोविड -19 च्या लसींचा एकूण 11.44 कोटी लसीकरणाचा टप्पा पार झाला आहे. सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील लसीकरणाला चालना देण्यासाठी, दिनांक 11 ते 14 एप्रिल 2021 या चार दिवसांच्या कालावधीत, देशभरात लसीकरण उत्सव(टीका उत्सव) साजरा करण्यात आला. या लसीकरण उत्सवाच्या कालावधीत,एकूण लसीकरणाच्या आकडेवारीनुसार 1,28,98,314 पात्र लोकसंख्येच्या समूहांना लसींचे डोस देऊन लसीकरणाने मोठी झेप घेतली आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकूण 16,98,138 सत्रांद्वारे 11,44,93,238 लसींच्या डोस देण्यात आले. यापैकी 90,64,527 आरोग्य कर्मचाऱ्यांना(HCW) पहिली मात्रा, 56,04,197 आरोग्य कर्मचाऱ्यांना (HCW) दुसरी मात्रा, 1,02,13,563, आघाडीच्या कर्मचाऱ्यांना (FLW) पहिली मात्रा, 50,64,862 कर्मचाऱ्यांना (FLW) दुसरी मात्रा, वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या 4,34,71,031 लाभार्थ्यांना पहिली मात्रा,तर 27,47,0192 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा, तसेच 45 ते 60 वर्षे वयोगटातील 3,74,30,078 लाभार्थ्यांना पहिली मात्रा तर 8,97,961 लाभार्थ्यांना दुसरी मात्रा,देण्यात आली.

Powered By Sangraha 9.0