लिक्विड ऑक्सिजनला पर्याय देण्यासाठी विकसित झाले 'हे' तंत्रज्ञान; राजेश टोपेंचे ट्विट

14 Apr 2021 18:34:36
rajesh tope_1  




मुंबई -
राज्यात सध्या आॅक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाने गंभीर स्वरूपात बाधित असणाऱ्या गंभीर रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. मराठवाड्यातील घनसावंगी तालुक्यात लिक्विड आॅक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून आॅक्सिजन घेऊन त्याच्या शुद्धीकरणाचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री यांनी हे तंत्रज्ञान यशस्वी ठरल्यास राज्यात आॅक्सिजनची कमतरता असणाऱ्या भागात या तंत्रज्ञानाचा अवलंब करता येईल, असे म्हटले आहे.
 
 
 
गंभीर स्वरूपात कोरोनाने बाधित बाधित असणाऱ्या रुग्णांना वाचवण्यासाठी सध्या लिक्विड ऑक्सिजन महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मात्र, राज्यात आॅक्सिजनची कमतरता जाणवत आहे. मंगळवारी झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात देखील त्यांनी ही राज्यात आॅक्सिजनची कमतरता जाणवत असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी राज्याने केंद्राकडे आसपासच्या राज्यांमधून ऑक्सिजन आणण्याची विनंती केली आहे. सध्या राज्य सरकार कोणकोणत्या राज्यातून आॅक्सिजन आणता येईल, याची चाचपणी करत आहे. अशातच मराठवड्यात लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून एक नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टि्व्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
 
 
 
 
टोपे ट्विट करुन म्हणाले की, "लिक्विड ऑक्सिजनला पर्याय म्हणून हवेतून ऑक्सिजन घेऊन त्याचे शुद्धीकरण करत २५ ते १०० खाटांच्या रुग्णालयासाठी वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. मराठवाड्यात घनसावंगी तालुक्यात हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये राबविण्यात येणार आहे.हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान म्हणजे मोठी उपलब्धी ठरणार आहे. हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर व कमी खर्चिक असल्याबरोबरच हव्या त्या ठिकाणी घेऊन जात उपयोगात आणता येणारे तंत्रज्ञान आहे."
 
 
Powered By Sangraha 9.0