कोरोना झाला म्हणून त्याने घेतली रेल्वेखाली उडी

    दिनांक  14-Apr-2021 18:45:37
|

train _1  H x W


डोंबिवली : कोरोना रुग्णाने डोंबिवली रेल्वे स्थानकात कोणार्क एक्सप्रेस खाली आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बोनवली हरिहर दास (४० वर्ष) असे त्या तरूणाचे नाव आहे. हा तरूण आजदेगावात राहणारा असून त्याला कोरोना झाला असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने लोहमार्ग पोलिसांना दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितले.
 
 
बोनवाल हा घरातून कोरोनावर उपचार करण्यासाठी जात असल्याचे सांगून पहाटे दोन वाजता घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो डोंबिवली स्थानकात पहाटे साडे तीन च्या सुमारास पोहोचल्याचे पोलिसांना सीसी कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. तेवढय़ात फलाट क्रमांक पाच वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस खाली त्याने स्वतःला झोकून दिले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.